Saroj Kamble Death Case: सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळे यांच्या मृत्यूचे गूढ उकलले, मुलगा इनायत परदेशी हाच मारेकरी असल्याचे उघड
Saroj Kamble Death Mystery Solved: स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक आणि कॉम्रेड शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील महत्वाच्या नेत्या, महाराष्ट्रातील परीवर्तनवादी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्व राहिलेल्या सरोज कांबळे-परदेसी यांच्या धक्कादायक मृत्यूचा उलघडा झाला आहे.
Saroj Kamble Death Mystery Solved: स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक आणि कॉम्रेड शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील महत्वाच्या नेत्या, महाराष्ट्रातील परीवर्तनवादी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्व राहिलेल्या सरोज कांबळे-परदेसी यांच्या धक्कादायक मृत्यूचा उलघडा झाला आहे. धुळे शहरातील आझादनगर पोलिसांनी 12 दिवस केलेल्या अथक तपासातून सरोज कांबळे यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. धक्कादायक म्हणजे सरोज कांबळे-परदेसी यांचा मुलगा इनायत परदेशी हाच त्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रदार असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी इनायत परदेशी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अन्वये सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात आघाडीवर राहिलेल्या सरोज कांबळे-परदेशी याच्या आकस्मीक मृत्यूने सत्यशोधकी, परिवर्तनवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
प्रपर्टी गमाविण्याच्या भीतीतून इनायत परदेशी याने आई सरोज कांबळे-परदेशी यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. वयोवृद्ध असलेल्या सरोज कांबळे या पुनर्विवाह करणार असल्याने त्यांच्या नावे असलेली मालमत्ता आपणास वारसाहक्काने मिळणार नाही. त्यामुळे मुलगा इनायत हा सरोज कांबळे यांच्याशी अत्यंत क्रूर वागत असे. तो त्यांना सतत मारहाण करत असे. तसेच, स्मृतीभंशाचा आजार जडलेल्या वडिलांना त्रास देण्याची भीती दाखवून त्यांच्या असहायतेचा फायदाही घेत असे. मुलगा इनायत याच्या सततच्या त्रासाला कंटाळून सरोज या इतर कार्यकर्ते किंवा नातेवाईकांकडे जात असत. परंतू, इनायत हा संबंधित नातेवाईक, कार्यकर्ते यांच्यावर अपहरणाची तक्रार करुन पोलिसांत गुन्हा नोंदवत असे. आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून त्या इनायत याचा त्रास सहन करत राहिल्या.
दरम्यान, धुळे शहरातील पाच जून रोजी नटराज चित्रमंदिरासमोर काझी प्लॉट भागातील सरोजनी ऊर्फ सरोज रणजित परदेशी- कांबळे (वय ६६) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केल्या. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरु केला. अखेर सरोजनी उर्फ सरोज परदेशी कांबळे यांच्या मृत्यूचे धाके त्यांचाच मुलगा इनायत याच्यापर्यंत पोहोचले.