Sarkari Naukri Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य विभागातील 17 हजार 337 रिक्त पदे 100% भरण्यास मान्यता

ही रिक्त पदे गेली अनेक वर्षे भरली गेली नाहीत. त्यामुळे कोरोना सारख्या महासंकटाच्या काळात राज्य सरकारला मनुष्यबळ हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी राज्य सरकारने नोकर भरती काढली आहे.

Government Job | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus), लॉकडाऊन (Lockdown) काळात सर्व काही ठप्प आहे. बाजारपेठा, उद्योगधंदे आणि सरकारी कार्यालयं आदींवर मोठ्या मर्यादा आल्या आहेत. नाही म्हणायला लॉकडाऊन हळूहळू शिथील होतो आहे. पण, या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत हेही खरे. असे असले तरी सरकारी नोकरी शोधत असलेल्या आणि त्यातही महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. आरोग्य विभागातील (Health Department of Maharashtra )  17 हजार 337 रिक्त पदे 100% भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ही माहिती दिली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही याबाबत माहिती दिल्याचे महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने म्हटले आहे. दरम्यान, राज्यभरातील आरोग्य विभागातील 17 हजार 337 रिक्त पदे आणि त्यासोबतच वैद्यकीय शिक्षण विभागातील 11हजार पदे तसेच विविध महापालिकांमधील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे. (हेही वाचा, Sarkari Naukri: मुंबई महानगर पालिकेत 144 जागांसाठी वॉर्ड बॉयची भरती होणार; portal.mcgm.gov.in पहा अधिक माहिती)

ट्विट

दरम्यान, आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संकटामुळे सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेतील अनेक पदे रिक्त झाली आहेत. ही रिक्त पदे गेली अनेक वर्षे भरली गेली नाहीत. त्यामुळे कोरोना सारख्या महासंकटाच्या काळात राज्य सरकारला मनुष्यबळ हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी राज्य सरकारने नोकर भरती काढली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif