Sarkari Naukri 2019: केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र पुणे येथे 'या' दोन महत्त्वाच्या पदांसाठी Walk in Interview, थेट मुलाखत देऊन 47,000 पेक्षा जास्त मिळणार वेतन

हा Walk in Interview येत्या 17 डिसेंबरला होणार आहे.

Representational Image (Photo Credits: File Photo)

सध्या मंदीमुळे सगळीकडे नोकरीची बोंबाबोब आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येकाचे ध्येय असते ते सरकारी नोकरी (Sarkari Naukri) मिळविण्याचे. मात्र आजच्या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी मिळवणेही अवघड झाले आहे. अशा लोकांना आनंदाची बातमी. केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र पुणे (CWPRS) येथे संशोधन सहकारी आणि कनिष्ठ संशोधन सहकारी या पदांसाठी सरळ मुलाखत प्रक्रिया होणार आहे. हा Walk in Interview येत्या 17 डिसेंबरला होणार आहे. सिंचन, जलविद्युत् ऊर्जा आणि जलवाहतूक यांच्याशी निगडित असलेल्या विविध प्रकल्पांना व्यापक विकास व संशोधन यांबाबतीत ही संस्था पाठबळ वा मदत पुरविते. याकरिता विवक्षित संशोधन अभ्यास हाती घेऊन त्यांना आवश्यक त्या मूलभूत संशोधनाद्वारे उत्तेजनही सदर संस्था देते. ही संस्था भारताच्या केंद्रीय शासनाला आपल्या क्षेत्रातील सल्लागारी सेवा देते.

कसे कराल नोकरीसाठी अर्ज:

संशोधन सहकारी आणि कनिष्ठ संशोधन सहकारी या पदांसाठी सरळ मुलाखत प्रक्रिया होणार असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची काही गरज नाही. यासाठी तुम्हाला केवळ मुलाखतीला जाण्याआधी agrawal_jd@cwprs.gov.in  या ईमेल वर तुमचा CV पाठवायचा आहे.

हेदेखील वाचा- Sarkari Naukri: मालेगाव महानगरपालिकेमध्ये तरूणांना नोकरीची संधी; थेट मुलाखती द्वारा निवड

शैक्षणिक पात्रता:

1. संशोधन सहकारी पदासाठी पीएचडी डिग्री किंवा त्या पदासंबंधित डिग्री असणे बंधनकारक आहे. तसेच तुम्हाला या संबंधित क्षेत्रात 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

2. कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी विज्ञानात पदव्युत्तर किंवा सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये पदव्युत्तर असणे बंधनकारक आहे.

वेतनश्रेणी:

1. संशोधन सहकारी पदासाठी 47,000 प्रतिमहा+ वेतनभत्ता देण्यात आला आहे.

2. कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी 31,000 प्रतिमहा+वेतनभत्ता देण्यात आला आहे.

मुलाखतीला जाताना उमेदवारांना आपला बायोडेटा, फोटो आणि संबंधित कागदपत्रे जवळ बाळगावी.