Nitesh Rane Seeks Pre-arrest Bail: संतोष परब हल्ला प्रकरणी नीतेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी
त्यामुळे नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान, नितेश राणे Nitesh Rane) यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज (29 डिसेंबर) सुनावणी होणार आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान, नितेश राणे Nitesh Rane) यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज (29 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. नितेश यांच्या जामीन अर्जावर कालच सुनावणी सुरु झाली होती. मात्र, कोर्टाची वेळ संपल्याने कोर्ट बंद झाले. या अर्जावर आज दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणे यांना जामीन मिळणार की त्यांची रवाणगी पोलिसांमार्फत तुरुंगात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर कोकाणातील वातावरण आगोदरच तापले आहे. त्यातच शिवसेना कार्यकर्ते असलेल्या संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाच आरोपींना अटक झाली आहे. या पाचपैकी एक जण हा नितेश राणे यांच्या स्वाभीमानी संघटनेचा पुणे येथील कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. आपल्यावर झालेला हल्ला हा नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरुनच झाल्याचा आरोप संतोष परब यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत संतोष परब यांच्यावर महाविकासआघाडीचे प्रचारप्रमुख अशी जबाबदारी आहे. (हेही वाचा, Nitesh Rane यांना जमीन मिळणार की अटक होणार? उद्या येणार न्यायालयाचा निर्णय; आज साडेतीन तास चालली सुनावणी)
दरम्यान, नितेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. त्यांना याबाबत विचारले असता आमदार नितेश राणे कोठे आहेत याबाबत आपल्याला माहिती नाही. ते कुठे आहेत ते मी का सांगू असेही ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे नितेश राणे हे अटक टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज प्रयत्न केला. मात्र, त्याला यश न आल्याने नितेश राणे यांच्या वकीलाने काल सिंधुदुर्ग बँक निवडणूक मतदानाचे कारण सांगत न्ययालयात अंतरिम जामीन मागितला. मात्र, तोही फेटाळला. न्यायालयात काल नितेश राणे यांच्या अर्जावर तीन तासांहून अधिक काळ सुनावणी झाली.
फिर्यादी संतोष परब यांच्या बाजूने अॅड. विकास पाटील शिरगावकर बाजू मांडत आहेत. तर नितेश राणे यांच्या बाजूने त्यांचे वकिल संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे बाजू मांडत आहेत. प्रदीप घरत हे सरकारी वकील म्हणून खटला लढत आहेत. सुनावणी सुरु असताना कोर्टाची वेळ संपली. दरम्यान, नितेश राणे यांच्या वकीलाने दहा मिनीटांचा वेळ वाढवून मागत नितेश राणे यांच्या अंतरिम जामीनाची मागणी केली मात्र न्यायालयाने ती फेटाळली. कोर्टात आता आज काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.