Sanjay Raut On Kirit Somaiya: किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे आणि अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? संजय राऊत यांचा पलटवार

एखादा व्यवसाय करणे गुन्हा किंव पाप आहे का? असा सवाल करत जर आमच्या वायनरी असतील तर किरीट सोमय्या यांनी त्या ताब्यात घेऊन चालवाव्यात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करत प्रत्युत्तर दिले आहे. एखादा व्यवसाय करणे गुन्हा किंव पाप आहे का? असा सवाल करत जर आमच्या वायनरी असतील तर किरीट सोमय्या यांनी त्या ताब्यात घेऊन चालवाव्यात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच, कोणाची मुले काय करतात हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत विषय आहे. किरीट सोमय्या यांची मुले चणे, शेंगदाणे किंवा अमित शाह (Amit Shah) यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? असा थेट सवाल करत संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत म्हटले की, बँकांना लुभाडणे, चोऱ्या माऱ्या करणे यापेक्षा कष्ट करणे केव्हाही चांगले. मात्र, आज काही भाजपची थोंडी लोकं सांगत आहेत की, आमच्या वायनरी आहेत. जर आमच्या वायनरी असतील तर त्या मी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे करुन द्यायला तयार आहेत. त्यांनी त्या खुशाल घ्याव्या आणि चालवाव्यात. आज मला शरद पवार यांचाही फोन आला होता. तेही असत होते, असे संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Kirit Somaiya On Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक- किरीट सोमय्या)

किरीट सोमय्या यांनी काय म्हटले होते?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधत म्हटले होते की, 'संजय राऊत (Sanjay Raut) हे वाईनबद्दल इतके का बोलत आहेत. संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे. वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगासोबत संजय राऊत (Kirit Somaiya On Sanjay Raut) यांची पार्टनरशीप आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन (Wine) विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत कुटुंबाने काही महिन्यापूर्वी वाईन व्यवसायातील मोठ्या उद्योगपतीशी बिझनेस पार्टनरशीप सुरू केली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व सहयोगी यांचे कारनामे हे केवळ पैसे आणि पैसे गोळा करणे इतकेच आहे. हे सरकार महाराष्ट्राला मद्य राष्ट्र बनवायला निघाले आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला होता.