Sanjay Raut यांचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा पाठवून महाविकास आघाडी सरकार आणि Mumbai Police यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र एटीएस पथक सक्षम असताना केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात पाठवणं याच्याद्वारा केंद्र राज्यात सरकार आणि पोलिस दलावर दबाव वाढवत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut | Photo Credits: ANI

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर आता मुंबई मध्ये Antilia Bomb Scare आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांची एंट्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा केंद्रावर हल्लाबोल केला आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी या प्रकरणांमध्ये आता महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कालच API सचिन वाझे यांना देखील एनआयए ने अटक केली आहे. त्यावरही बोलताना संजय राऊत यांनी त्यांची पाठराखण केल्याचं पहायला मिळालं आहे. नक्की वाचा:  सचिन वाझे यांच्या अटकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी करण्याची किरीट सोमय्या यांची मागणी (Watch Video).

दरम्यान राज्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि Antilia Bomb Scare चा तपास करण्यास मुंबई पोलिस सक्षम आहे. पण केंद्राकडून NIA सारखी केंद्रीय तपास यंत्रणा पाठवून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'आम्हांला NIA बद्दल आदर आहे. पण मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र एटीएस पथक सक्षम असताना केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात पाठवणं याच्याद्वारा केंद्र राज्यात सरकार आणि पोलिस दलावर दबाव वाढवत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे.

ANI Tweet

सचिन वझे हे सक्षम अधिकारी आणि प्रामाणिक आहेत. त्यांना मुकेश अंबानी यांच्या घराजवळ असलेल्या गाडीत जिलेटीन कांड्या सापडल्याने ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम होती, केंद्रीय यंत्रणेची त्यामध्ये गरज नव्हती असे संजय राऊत म्हणाले आहेत.