Sanjay Raut on Hindenburg: हिंडेनबर्ग प्रकरणावरुन उत्तरे देण्याऐवजी राहुल गांधी यांनाच नोटीस, संजय राऊत यांचे टीकास्त्र

ते रत्नागिरी दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, भारतीय लोकशाहीत प्रसारमाध्यमांचा आदर केला जातो. पण, बीबीसीवरील छापा हा प्रसारमाध्यमांसाठी इशारा असल्याचेही राऊत म्हणाले

Sanjay Raut | (Photo Credit - ANI/Twitter)

लोकशाहीचे मुखवटे लावून देशात दहशत माजविण्याे काम सुरु आहे. मुख्य मुद्दे बाजूलाच ठेऊन भलतेच विषय पुढे रेटले जात आहे. देशात लोकशाही राहिलीच कुठे आहे? सगळ्या यंत्रणा, न्यायालयं खिशात टाकून लोकशाहीची हत्या केली जात आहे. विरोधात कोणी बोलले तर त्याच्यावर दबावाचे राजकारण केले जात असल्याची टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केली आहे. हिंडेनबर्ग (Sanjay Raut on Hindenburg) प्रकरणावरुन आम्ही संसदेत प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे द्यायचे सोडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठवले जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते रत्नागिरी दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, भारतीय लोकशाहीत प्रसारमाध्यमांचा आदर केला जातो. पण, बीबीसीवरील छापा हा प्रसारमाध्यमांसाठी इशारा असल्याचेही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना म्हटले. देशात सध्या अघोषीत आणिबाणी सुरु आहे. या देशात इंदिरा गांधी यांनीही आणीबाणी लावली. पण त्यांनी देशांतर्गत धोका वाढत आहे असे सांगून आणि त्यासाठी कारणे देऊन आणीबाणी लावली. त्यांनी उघड आणबाणी लावली. कोणी सांगूण जर उघड आणीबाणी लावत असेल ती आम्हाला मान्य आहे. परंतू, केवळ लोकशाहीचा मुखवटा लावून जर कोणी अप्रत्यक्षरित्या आणीबाणी लावत असेल तर ती आम्हाला मान्य नाही, असे संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut On Governor Resignation: भगतसिंग कोश्यारी राजभवनात भाजपचे एजंट होते, राज्यपालांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचा टोला)

दरम्यान, विरोधकांनी काही प्रश्न विचारले, आवाज उठवला तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न होतो. मलाही तुरुंगात टाकले. तुरुंगात मला मारण्याचाही प्रयत्न झाला, असा दावा संजय राऊत यांनी या वेळी केला. देशात सध्या अनेक प्रश्न आहेत. त्यावरुन आम्ही संसदेमध्ये प्रश्न विचारत असतो. हिंडेनबर्ग प्रकरणावरुनही आम्ही केंद्र सरकारला प्रश्न विचारले. परंतू, त्यावर उत्तरे देण्यापेक्षा विचारलेले प्रश्नच संसदेच्या कामकाजातून काढून टाकले. इतकेच नव्हे तर हे प्रश्न केवळ काढून टाकेल नाहीत तर त्यावरुन राहुल गांधी यांनाच नोटीस पाठविण्यात आली. हे सगळे काय सुरु आहे? लोकशाहीची गळचेपीच तर सुरु आहे, असेही संजय राऊत म्हणाले.