'तुमचे असणे आमच्यासाठी गरजेचे आहे' असे ट्विट करत संजय राऊतांनी नागरिकांना दिला भावनिक संदेश
संजय राऊतांनी केलेल्या ट्विटमध्ये 'जिथे आहात तिथे खूश रहा, तुम्हाला भेटणे गरजेचे नसून तुमचे असणे जास्त गरजेचे आहे' असे या ट्विटमध्ये म्हटले आङे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (Coronavirus) परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत चालली असून देखील सरकारने सांगितलेल्या सूचना पाळत नाही. ज्याचा परिणाम कोरोना ग्रस्तांच्या वाढत जाणा-या आकडेवारीवरून कळत आहे. महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांचा आकडा आता 100 च्या वर जाऊन पोहोचला आहे. तरी लोकांना याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. घराबाहेर पडून, गर्दी करुन हे नागरिकांना सरकारच्या समस्या आणखी वाढवत आहेत. शिवाय कोरोना व्हायरस सारख्या विषाणूला आमंत्रण देत आहेत. म्हणूनच शिवसेना खासरदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन जनतेला भावनिक सल्ला दिला आहे.
संजय राऊतांनी केलेल्या ट्विटमध्ये 'जिथे आहात तिथे खूश रहा, तुम्हाला भेटणे गरजेचे नसून तुमचे असणे जास्त गरजेचे आहे' असे या ट्विटमध्ये म्हटले आङे.
पाहा ट्विट:
हेदेखील वाचा- यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन
कोरोना व्हायरस (Coronavirus) महाराष्ट्र आणि देशात आपला प्रादुर्भाव वाढवताना दिसतो आहे. एकट्या महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधिक रुग्णांची संख्या 101 इतकी झाली आहे. तर देशातील एकूण कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 446 वर पोहोचली आहे. सांगली येथे काल कोरोना व्हायरस बाधित 4 रुग्ण सापडले. तर आजही पुणे येथे 3 तर सातारा येथे एक नवा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संकटाचे सावट आता अधिकच गडद झाले आहे.
देशातील एकूण स्थितीचा विचार करता कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात अधिक आहे. त्यानंतर केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळ राज्यातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या आता 60 इतकी झाली आहे. कोरोना व्हायरस संकट आता अधिक गरिरे होऊ नये यासाठी देशभरातील जवळपास 20 शहरं लॉकडाऊन करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्र आणि पंजाब, दिल्ली आणि इतरही काही राज्यांमध्ये संचारबंधी लागू करण्यात आली आहे.