उदयनराजे भोसले यांचे भाजपसाठी योगदान काय? पडलेल्या माणसाला पक्ष उमेदवारी कशी देईन? संजय काकडे यांचा सवाल

कारण ते केंद्रात मंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा आहेत. दुसऱ्या जागेसाठी साताराचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित समजले जात आहे. परंतू, काकडे यांनी उदयनराजे यांच्या नावावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने भाजपच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटते हे पाहावे लागणार आहे.

Udayanraje Bhosale, Sanjay Kakade | (Photo credit: archived, edited, symbolic images)

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी पुन्हा एकदा राज्यसभा (Rajya Sabha) सदस्यत्वाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. मी भाजपचा सहयोगी म्हणून नव्हे तर भजपच्या तिकाटीवर राज्यसभेसाठी उमेदवारी करु इच्छितो. मी पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे भाजप (BJP) आपला विचार करेन. देवेंद्र फडणीस आपल्याला डावलणार नाहीत. जेव्हा डावलतील तेव्हा बघू असे काकडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे भाजपसाठी योगदान काय? पडलेल्या माणसाला पक्ष उमेदवारी देईनच कशी? असा सवालही काकडे यांनी केला आहे.

येत्या एप्रिल महिन्यापर्यंत राज्यसभेतील एकूण 6 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. भाजपचे असलेले एकूण संख्याबळ पाहाता भाजपचे 2 उमेदवार राज्यसभेवर सुरक्षीतपणे जाऊ शकतात. तिसऱ्या उमेदवाराला निवडूण येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे आहे. यात महत्त्वाचे म्हणेज एका जागेवर भाजपला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पाठवावे लागणार आहे. कारण ते केंद्रात मंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा आहेत. दुसऱ्या जागेसाठी साताराचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित समजले जात आहे. परंतू, काकडे यांनी उदयनराजे यांच्या नावावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने भाजपच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटते हे पाहावे लागणार आहे.

संजय काकडे यांनी थेट उदयनराजे भोसले यांच्या कार्यक्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. उदयनराजे भोसले यांचे भाजपसाठी योगदान काय? ते स्वत: लोकसभेवर खासदार होते. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये आले. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि ते पडले. त्यांच्या भावानेही भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधानसभेसाठी निवडूण आले. पण, त्या पलिकडे उदयनराजे भोसले यांचे कार्य काय? ते एक आमदारही निवडूण आणू शकले नाहीत. त्यामुळे पडलेल्या माणसाला पक्ष उमेदवारीच कसा देईल, असा सवाल काकडे यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Elections 2020: राज्यसभेवर महाराष्ट्रातून कोणाची वर्णी? शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, हंसराज अहीर यांच्यात चूरस)

दरम्यान, आपण भाजपमधील कोणाशी उमेवादीरसंदर्भात बोलला आहात का, असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना काकडे यांनी म्हटले आहे की, मी माझी भूमीका देवेंद्र फडणीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. माझ्या भूमिकेबाबत त्यांनाच विचारा. फडणीस आपल्याला डावलणार नाहीत. आपला त्यांच्यावर विश्वास आहे. ते आपल्याला उमेदवारी मिळवून देतील. त्यांनी जर डावलले तर मग पुढचे बघू, असे संजय काकडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे काकडे याच्या दाव्याला भाजपमधून किती प्रतिसाद मिळतो याबाबतही उत्सुकता आहे.