Sanjay Biyani Murder Case: नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
त्यांच्यावर खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नांदेड (Nanded) मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्यावर आज झालेल्या गोळीबारानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बियाणी घराबाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावरील गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस तपास सुरू असून हल्लेखोरांचा देखील शोध सुरू आहे. Vimantal पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध घेण्यासाठी SIT team बनवण्यात आली आहे अशी माहिती नांदेड एसपी Pramod Kumar Shiwale यांनी दिली आहे.
बियाणी यांच्यासोबतच त्यांचे चालक देखील जखमी झाले आहेत. त्यांना खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये संजय बियाणींचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. धक्कादायक! कौटुंबिक वादात ढवळाढवळ केल्याने पत्नीसह 2 मेहूण्यांना घातल्या गोळ्या; तिघांचा मृत्यू .
संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर आहेत. त्यांच्यावर खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नांदेड मध्ये मागील काही दिवसांत गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला असून आता शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.