महिलांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स 1 रुपया प्रतिपॅड दराने उपलब्ध
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स 1 रुपया प्रतिपॅड दराने उपलब्ध होत आहेत. देशभरातील वाढता कोरोना संसर्गामुळे केंद्रीय औषधीनिर्माण विभागाच्यावतीने प्रतिपॅड 1 रुपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील (Maharashtra) 36 जिल्ह्यामध्ये 455 जनऔषधी केंद्रांमध्ये (Jan Aushadhi Kendra) सॅनिटरी नॅपकिन्स (Sanitary Napkins) 1 रुपया प्रतिपॅड दराने उपलब्ध होत आहेत. देशभरातील वाढता कोरोना संसर्गामुळे केंद्रीय औषधीनिर्माण विभागाच्यावतीने प्रतिपॅड 1 रुपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. जनऔषधी केंद्रामार्फत विक्री करण्यात येणारे हे पॅड पर्यावरणाला अनुकूल आहेत. या पॅडसाठी वापरण्यात येणारे साहित्य जैव-विघटनशील आहे. या पॅडमधील साहित्य ‘एएसटीएम डी-6954’ मानकांनुसार बनविण्यात आले आहे. बाजारात एका नॅपकिन्सची किंमत 3 ते 8 रुपये आहे. त्यामुळे महिलांना हे पॅड वापरणे न परवडणारे आहे. परंतु, सरकारच्या या निर्णयामुळे महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे. (हेही वाचा - Ganeshotsav 2020: गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना गणेश मंडळांना मान्य)
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व जिल्ह्यात भारतीय जनऔषधी केंद्रे सुरू आहेत. या केंद्रामार्फत औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. या सर्व जनऔषधी केंद्रांमधून सॅनिटरी नॅपकिन्स 1 रुपये प्रतिपॅड दराने उपलब्ध करून दिले जात आहेत. राज्यातील महिला या जनऔषधी केंद्रामधून सॅनिटरी नॅपकिनची खरेदी करू शकतात.