Sangli Flood: सांगली मधील ब्रम्हनाळ गावात पूरग्रस्तांना मदतीदरम्यान अपघात; बोट उलटल्याने 16 जण बुडाल्याची भीती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हवाई पाहणी करणार आहेत. एनडीआरएफ पथकांसोबत सैन्य दल काम करत आहे.
Bhamnal Accident: कोल्हापूर, सांगली मध्ये तुफान पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. यामध्ये पूरग्रस्तांना मदतीचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान स्थानिक बोटीतून प्रवास करताना एक बोट उलटल्याची दुर्दैवी घटना सांगली (Sangli) येथील ब्रम्हनाळ (Bhamnal) गावात घडली आहे. पावसामुळे साचलेल्या पाण्याची उंची वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान 25-30 जणांना घेऊन जाणारी एक बोट उलटली आहे. यामध्ये लाईफ जॅकेट नसल्याने काही जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडल्याचं म्हटलं जात आहे.
ब्रम्हनाळ दुर्घटनेत 16 जण वाहून गेल्यची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या 9 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हवाई पाहणी करण्यासाठी आज कोल्हापूर, सांगली, सातारा दौर्यावर आहेत. एनडीआरएफ पथकांसोबत सैन्य दल काम करत आहे. ब्रम्हनाळ मधील दुर्घटनेत 3 मुलं, 5 महिला आणि 8 पुरूष असल्याची माहिती देण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूरला महापुराचा फटका, कराड पाण्याखाली; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु, हेल्पलाईन नंबर प्रसारित
ANI Tweet
सराकारी यंत्रणा ब्रम्हनाळ गावात न पोहचल्याने अचानक पाणी वाढल्याने नागरिकांनी स्थानिक मदत घेऊन बाहेर पडताना हा प्रकार घडला आहे.पाण्याचा विसर्ग झाल्यास पूराचं पाणी कमी होणार आहे. पलूस सांगली येथे उलटलेली बोट ही ग्रामपंचायतीची असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती एनडीआरएफनं दिली.