Sangli Crime: प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी केली आजीची हत्या, 3 जणांना अटक

याप्रकरणी पोलीसांनी आजीच्या एका अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आणि सूनेलाही बेड्या ठोकल्या आहेत.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

प्रॉपर्टीच्या वादातून सांगलीमध्ये (Sangli Crime) एका आजीचा नातवांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली.  या हत्येसाठी आरोपींच्या आईनेही मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  तिघांनी मिळून 80 वर्षीय आजीचा टॉवेलनं गळा आवळून हत्या केली. सांगली जिल्ह्यातील खानापूर (Khanapur) या तालुक्यात ही घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (sangli police) तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.  दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (हेही वाचा -  Nagpur Shocker: पत्नीने जेवण बनवायला नकार दिल्याने पतीने दिली घर जाळण्याची धमकी)

सखुबाई संभाजी निकम असे मृत झालेल्या आजीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी आजीच्या एका अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आणि सूनेलाही बेड्या ठोकल्या आहेत. आशिष सतीश निकम आणि रेणुका सतीश निकम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

सतीशशेठ निकम यांचा सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. त्यांची विटा, चिंचणी (मं.) यासह विविध ठिकाणी प्रॉपर्टी आहे. यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी त्यांची पारे येथील बहीण संगिता रामचंद्र साळुंखे यांनी भाऊ सतीश यांना सांगितले होते. त्याच रागातून मंगळवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास हे तिघेही सतीश यांची बहीण संगिता यांच्या पारे येथील घरी गेले. त्यावेळी सखुबाई या मुलगी संगिताच्या घरी होत्या. या तिघांनी पुन्हा त्याठिकाणी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर आजी सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यांचा टॉवेलने गळा आवळला.