Samruddhi Mahamarg Traffic Update: समृद्धी महामार्गावर 21 आणि 22 नोव्हेंबर दरम्यान 4 तासांचा ब्लॉक; या भागात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
21 आणि 22 नोव्हेंबर दिवशी दुपारी 12 ते 4 दरम्यान काम सुरू असताना जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान पर्यायी मार्गाने वाहतू वळवली जाणार आहे.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवर बसवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. त्यासाठी या समृद्धी महामार्गाच्या जालना ते छत्रपती संभाजीनगर या भागातील समृद्धी महामार्ग 2 दिवस बंद ठेवला जाईल. 21 आणि 22 नोव्हेंबर दिवशी समृद्धी महामार्गावरील वाहतूक 12 ते 4 या वेळेमध्ये बंद ठेवली जाणार आहे. समृद्धी महामार्गावर काम सुरू असताना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
21 आणि 22 नोव्हेंबर दिवशी दुपारी 12 ते 4 दरम्यान काम सुरू असताना जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान, समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे जाणार आहे. नक्की वाचा: Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर रिल्स बनवणाऱ्यांवर बंदी, पोलिसांचा गंभीर इशारा .
समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूर कडे जाणार आहे. 12 ते 4 ही वेळ वगळता अन्य वेळेत वाहतूक नियमित राहणार आहे.