Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पोलिस वाहनाला ट्रकची धडक; महिला पोलिस निरीक्षकाचा जागीच मृत्यू
परभणी येथून नागपूरला आरोपीला घेऊन जाणार्या हरियाणा राज्यातील पंचकुला मधील पोलिसांच्या गाडीला समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात झाला आहे.
परभणी येथून नागपूरला आरोपीला घेऊन जाणार्या हरियाणा राज्यातील पंचकुला मधील पोलिसांच्या गाडीला समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात झाला आहे. पोलिस वाहनाला ट्रकने मागून धडक दिल्याने जबर अपघात झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान ही घटना पांढरकवढा गावाजवळ झाली आहे. या अपघातामध्ये एका महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 कर्मचारी आणि आरोपी जखमी झाले आहेत. नेहा चव्हाण असं मृत पोलिस निरीक्षकाचं नाव आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फसवणूकीचा गुन्ह्यातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याका बोलेरो मधून नेत असताना समृद्धी महामार्गावर पांढरकवडा गाव परिसरात पोलिस वाहन समोरील ट्रकला मागाहून धडकले. या भीषण अपघातात पोलिस वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. यामध्ये नेहा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर वाशिम येथील कारंजाजवळ अपघात, दोन ठार, दोन गंभीर जखमी .
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक, संदीप खरात हे कर्मचाऱ्यांना घेऊन अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले. तसेच जाम महामार्ग पोलिसही अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना त्यांनी सावंगी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातातील आरोपी ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली.
समृद्धी महामार्ग हा वेगवान प्रवासासाठी सुरू करण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर महामार्गातील सध्या शिर्डी-नागपूर टप्पा सुरू झाला आहे. पण या महामार्गावर त्याच्या उद्घाटनापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे वेळ वाचवण्याच्या धडपडीमध्ये काहींनी जीव गमावला आहे.