Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी

आज पुन्हा एकदा घडलेल्या ताज्या अपघातात समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) तीघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg News) अनेक उपाययोजना करुनही अपघातांची (Accident) मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा घडलेल्या ताज्या अपघातात समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) तीघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कोपरगाव शिवारातील धोत्रे शिवारात अपघाताची (Accident News) ही घटना घडली. महामार्गावर एक नादुरुस्त कंटेनर उभा होता. त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी काही लोक गुंतले होते. द म्यान, पाठीमागून आलेल्या भरधाव कारने कंटेनरचालकाला जोराची धडक दिली. त्यानंतर ही कार महामार्गार दूरवर जाऊन आदळली आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

सर्व मृत जालना जिल्ह्यातील

पोलिसांनी अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी (9 फेब्रुवारी) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. मदत आणि बचाव कार्य सुरु केले. मात्र, तत्पूर्वीच अपघातग्रस्त कार MH 21 BF 9248 मधील तिघांचा मृत्यू झाला होता. दोघे गंभीर जखमी होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे तिघेही जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी आहेत. हे तिघे आणि जखमी असलेले दोघे असे पाच जण मिळून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांची नावे फलके आणि वाघ अशी आहेत. त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, समृद्धी महामार्ग आणि अपघातांची मालिका)

मृतदेहांचे होणार शवविच्छेदन

पलिसांनी अघपातातील मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तिन्ही मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. ज्याच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरपर्यंत सुरु होती. (हेही वाचा, Samruddhi Mahamarg: कानात हेडफोन, मोबाईलवर सिनेमा पाहा समृद्धी महामार्गावर चालवली बस, मनसेकडून कारवाईची मागणी (Watch Video))

पोलिसांवर प्रश्नचिन्ह

अपघाताबाबत अधीक माहिती अशी की, महामार्गावर उभा असलेला नादुरुस्त कंटेनर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सुरु होता. हा कंटेनर बराच काळ तिथे उभा होता. पाठिमागून येणाऱ्या कारचालकाला या कंटेनरचा अंदाज आला नाही. ज्यामुळे वेगवान कार आगोदर कंटेनरच्या बाजूलाउभ्या असलेला चालकाला धडकली आणि मग जाऊन कंटेनरलाही धडली आणि हा अपघात घडला. दरम्यान, या अपघातामुळे अनेक प्रश्न उभा राहिले आहेत. जसे की हा कंटनेटर वळीच बाजूला का करण्यात आला नाही. महामार्गावर पोलीस गस्त घालत नव्हते का? वगैरे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



संबंधित बातम्या