Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती आज स्पष्ट करणार दिशा; राज्यसभा उमेदवारीबाबतही आज पत्रकार परिषदेत भूमिका होणार स्पष्ट

राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर करुन त्यांनी दावा सांगीतला होता. आपण लढणाऱ्या अपक्ष उमेदवारीसाठी सर्व पक्षीयांनी पाठिंबा द्यावा, अशीही भूमिका त्यांनी व्यक्त केली होती.

Sambhajiraje Chhatrapati | (File Image)

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) आज (27, मे) पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर करुन त्यांनी दावा सांगीतला होता. आपण लढणाऱ्या अपक्ष उमेदवारीसाठी सर्व पक्षीयांनी पाठिंबा द्यावा, अशीही भूमिका त्यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी सत्ताधारी शिवसेना पक्षालाही गळ घातली होती. मात्र, शिवसेनेने आपला स्वतंत्र उमेदवार जाहीर केला. त्यामुळे राजे आता काय करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati press conference today) आपली भूमिका स्पष्ट करतील असे सांगितले जात आहे.

मुंबई येथे सकाळी 11 वाजता संभाजीराजे छत्रपती हे पत्रकार परिषद घेतील. आजच्या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे. अपेक्षित आहे की, ते आपली पुढील दिशा स्पष्ट करतील. संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी घोषीत केली असली तरी त्यासाठी 10 आमदार अनुमोदक असावे लागतात. काही अपक्ष वगळता संभाजीराजे छत्रपती यांना महाविकासाघाडी अथवा भाजप यापैकी एकाही आमदाराने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती हे कसे लढणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: मुख्यमंत्री जसं ठरलंय तसेच करतील; संभाजीराजे छत्रपती यांची एका वाक्यात प्रतिक्रिया)

संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. मुख्य प्रवाहातील कोणत्याही राजकीय पक्षाने संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबाच दिला नाही. त्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे आता या संघटना काय भूमिका घेतात. त्यावर छत्रपती संभाजी महाराज काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.

कोल्हापुरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच संभाजीराजे यांच्या उमेदवारीच्या सर्व शक्यात जवळपास संपल्या होत्या. त्यामुळे आता त्यांना भाजपने पाठिंबा दिला तरच त्यांचे राज्यसभेवर जाणे शक्य राहिले आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये काय घडते याबाबत उत्सुकता आहे.