Sambhajinagar Shocker: लग्नाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक; विवाह सोहळ्यानंतर दागिने घेऊन वधू गायब, तक्रार दाखल

त्यामुळे त्याने आरोपी कुंडलिक चव्हाण, कल्पना मुरळकर, संगीता चव्हाण यांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

indian--bride | (Photo courtesy: Wikimedia Commons)

संभाजीनगर (Sambhajinagar) परिसरात लग्नाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक (Fraud) होत असल्याची बाब समोर आली आहे. या ठिकाणी लग्नानंतर रोख रक्कम व दागिने घेऊन पळून जाणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चारपैकी तिघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या लोकांनी कुबेर गेवराई येथील एका व्यक्तीची 3 लाख रुपयांची आणि दागिन्यांची फसवणूक केली होती. ही घटना 26 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान घडली. या प्रकरणी आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली. मात्र, वधू अद्याप फरार आहे. तपासादरम्यान आरोपींनी अशाच प्रकारे इतर अनेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र अशोक कुबेर (33, कुबेर गेवराई) याने आरोपी कुंडलिक शाहू चव्हाण (कमलापूर) याची भेट घेतली आणि आपल्यासाठी वधू शोधण्यास सांगितले. चव्हाण, कल्पना प्रकाश मुरळकर, मनीषा कुंडलिक चव्हाण यांच्यासह अन्य आरोपींनी कुबेरला गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी येथे कुसुम अजय चव्हाण नावाची एक मुलगी दाखवली.

त्यानंतर या मुलीसोबत लग्न लावून देण्यासाठी त्यांनी कुबेरकडून 3 लाख रुपये घेतले. पुढे  3 एप्रिल रोजी कुबेर गेवराई येथे हा विवाह पार पडला आणि समारंभात कुबेरने वधूला दागिने दिले. मात्र, त्याचदिवशी वधूने सांगितले की, तिच्या चुलत भावाचा मृत्यू झाला असून, तिला त्याच दिवशी अंत्यसंस्काराला उपस्थित राहावे लागणार आहे. ती निघून गेली त्यानंतर ती कुबेरकडे परतली नाही. त्यानी वधूशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. (हेही वाचा: Digital Arrest Fraud: सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून केली जात आहे 'डिजिटल अटक' फसवणूक; Maharashtra Cyber Department ने जारी केला इशारा)

त्यानंतर आपले खोटे लग्न लावून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने आरोपी कुंडलिक चव्हाण, कल्पना मुरळकर, संगीता चव्हाण यांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली, मात्र वधू कुसुम चव्हाण अद्याप फरार आहे. तपासादरम्यान आरोपींनी नानासाहेब बांदल (वाई, सातारा), विनोद वाघ (वाई, सातारा), युवराज बांदल (वाई, सातारा), विपुल पाटील (सुरत, गुजरात) आणि सिल्लोड येथील अन्य तरुणांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. यासह भटाणा, वैजापूर, नेवासा, अहमदनगर, मालेगाव, नाशिक आदी ठिकाणीही खोटी लग्ने लावून दिले होते. आता अशा आरोपींकडून फसवणूक झाली असल्यास वाळूज एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif