Sambhaji Raje Hunger Strike: आझाद मैदान येथे संभाजी राजे यांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन, राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर तरुण मुंबईत दाखल

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून तरुण मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे.

Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) भोसले आज मुंबई (Mumbai) येथील आझाद मैधान (Azad Maidan) येथे आजपासून (26 फेब्रुवरी) अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून तरुण मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. राज्यातील विविध मराठा संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यात आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

संभाजीराजे यांच्या आंदोलनातील महत्त्वाच्या मागण्या

(हेही वाचा, Sambhaji Chhatrapati's letter to CM: 'MPSC विद्यार्थ्यांना 2 वर्ष वाढीव संधी द्या'; संभाजी छत्रपती यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र)

सकाळी 11.30 वाजता संभाजीराजे आझाद मैदान या ठिकाणी दाखल होतील. त्यानंतर त्यांचे आंदोलन सुरु होईल. तत्पूर्वी सकाळी 10.50 वाजता मुंबई येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर 11.15 वाजता आझाद मैदान येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला जाईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करत उपोषणास सुरुवात होईल.