Uddhav Thackeray: उध्दव ठाकरेंच्या मशालीवर समता पक्षाचा दावा, दाद मागण्यासाठी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव
मशाल हे चिन्ह उध्दव ठाकरे गटाचं नसुन समता पक्षाचं आहे अशा आशयाचं पत्र समता पक्ष श्रेष्ठींनी निवडणुक आयोगास लिहलं आहे.
उध्दव ठाकरेंवरील (Uddhav Thackeray) संकटांचा पाढा काही संपता संपेना. आधी पक्षासाठी मग पक्षाच्या नावासाठी आणि पक्षाच्या चिन्हासाठी उध्दव ठाकरेंना लढा द्यावा लागला. पण आता शिंदे विरुध्द ठाकरे (Shinde VS Thackeray) या लढाई समसमान अधिकार देता निवडणुक आयोगाने (Election Commission) दोन्ही गटाला वेगळे नाव आणि वेगळे चिन्ह देवू केले आहे पण आता उध्दव ठाकरेंचं निवडणुक चिन्ह (Uddhav Thackeray Election Symbol) पुन्हा एकदा धोक्यात आलं आहे कारण राज्यातील समाता पक्षाने (Samta Party) या निवडणुक चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. मशाल हे चिन्ह उध्दव ठाकरे गटाचं नसुन समता पक्षाचं आहे अशा आशयाचं पत्र समता पक्ष श्रेष्ठींनी निवडणुक आयोगास लिहलं आहे. एवढचं नाही तर पक्ष चिन्हावर दावा सांगण्यासाठी समता पक्षाने थेट दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) धाव घेतली आहे. तरी एकंदरीत परिस्थिती बघता उध्दव ठाकरेंच्या संकटात मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणजेचं उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा आपल्या पक्षचिन्हासाठी लढा द्यावा लागणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तरी थेट उध्दव ठाकरे गटाच्या पक्ष चिन्हावर दावा सांगणारा हा समता पक्षाची महाराष्ट्रातील मान्यता 2004 सालीच रद्द झाली आहे. तरी संपलेलया पक्षाचा पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकण कितपत वैध आहे हा निर्णय आता न्यायालयचं घेवू शकतो. (हे ही वाचा:- Eknath Shinde on Nilwande Canal: निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश)
निवडणुक आयोगाकडून देवू केलेल्या मशाल चिन्हावर ठाकरेंची शिवसेना अंधेरीतील पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election 2022) लढणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता प्रचाराला सुरुवातही झाली आहे. तरी समता पक्षाच्या या दाव्यानंतर उध्दव ठाकरे पुढे नवं विघ्न येवून ठेपल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.