Salman Khan Farmhouse: सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींचा घुसण्याचा प्रयत्न

अभिनेता सलमान खानच्या पनवेल मधील फार्महाऊस च्या तारा तोडून आतमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना सुरक्षारक्षकांनी पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Salman Khan (PC - Instagram)

सलमान खानच्या (Salman Khan) पनवेल (Panvel) येथील फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या पनवेल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सुरक्षा रक्षकांना संशय आल्यानंतर लगेचच त्यांनी त्या दोघांना पकडून पोलीसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिलं आहे. (हेही वाचा - Tiger 3 OTT Release: सलमान आणि कतरिनाचा 'टायगर 3' ओटीटीवर रिलीज, या ठिकाणी पाहता येणार)

अभिनेता सलमान खानच्या पनवेल मधील फार्महाऊस च्या तारा तोडून आतमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना सुरक्षारक्षकांनी पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. अजेशकुमार ओमप्रकाश गिल आणि गुरुसेवकसिंह तेजासिंह सीख असे या दोघांची नावं आहेत.  4 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता वाजे गाव येथील अभिनेता सलमान खान याच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये तारा आणि झाडांच्या कम्पाऊंडमधून घुसण्याचा या दोघांनी प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले असता त्यांनी आपली खोटी नावे सांगितली.

सलमान खानचं पनवेल येथील फार्महाऊस बहीण अर्पिताच्या नावावर आहे. हे आलिशान फार्महाऊस 150 एकरमध्ये पसरलं आहे. ज्यामध्ये जिम, स्विमिंग पूल आणि फॉर्मिंगची सर्व व्यवस्था आहे. या फार्महाऊसमध्ये शेती करतानाचे फोटो सलमानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif