Safe Mother Safe Home: नवरात्री निमित्त राज्यातील महिलांसाठी विशेष आरोग्य अभियान, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची मोठी घोषणा

एका अनोख्या उपक्रमासह यावर्षी नवरात्रीचे नऊ दिवस साजरे करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

देशभरात आजपासून नवरात्री (Navratri) उत्सवाला सुरुवात झाली आहे. शक्ती आणि उपासनेचा हा उत्सव पुढील नऊ दिवस दणक्यात साजरा केला जाणार आहे. संपूर्ण देशात नवरात्रीचा (Navratri 2022) विशेष उत्साह असतो. नवरात्री हा सण श्रध्देचा, उपासनेचा, देवी आईच्या जागराचा आहे. देशातील विविध राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. पश्चिम बंगालची (West Bengal) दुर्गापूजा (Durga Pooja), गुजरातच्या (Gujarat) दिंडीया (Dandiya) असा विविधतेने नटलेला हा उत्सव असतो. तसेच महाराष्ट्रातही (Maharashtra) देवी आईचा जागर करत महाराष्ट्रात नवरात्राचा उत्सव धुमधडाक्यात पार पडतो. आज पासून सुरु होणाऱ्या नवरात्राबाबत राज्य सरकारने (Maharashtra Government) देखील मोठा निर्णय घेतला आहे. एका अनोख्या उपक्रमासह यावर्षी नवरात्रीचे नऊ दिवस साजरे करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

 

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या (Shardiya Navratri) निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत " माता सुरक्षित तर घर सुरक्षित " (Safe Mother Safe Home) हे विशेष अभियान राबवण्यास सुरुवात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी रहावी,जागरूक रहावी व समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन राज्य सरकारकडून (Maharashtra Government) करण्यात आलं आहे. (हे ही वाचा:- Navratri 2022: राजकीय नेत्यांमध्येही नवरात्रीचा उत्साह, ट्वीट करत दिल्या खास शुभेच्छा)

 

 

या अभियाना अंतर्गत राज्यातील सरकारी इस्पितळात गरोदर माता व 18 वर्षावरील महिलांची मोफत आरोग्य (Free Health Check Up) तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. तरी राज्यभरातील महिलांनी या अभियानास उत्सफूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन राज्य सरकारकडून (Maharashtra Government) करण्यात आलं आहे. कारण गृहिणी खेड्यातील असो वा शहरातील त्या कायमचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. म्हणूनचं राज्य सरकार नवरात्राच्या निमित्ताने हा विशेष उपक्रम राबवणार आहे.