Sadhus Beaten Up in Sangli: साधूंना बेदम मारहाण, मुलं चोरणारी टोळी समजून कृत्य; सांगली येथील घटना

जत (Jath) तालुक्यातील लवंगा (Lavanga ) गावात ही घटना घडली. सर्व साधू उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मथुरा (Mathura) येथील होते होते. कर्नाटक येथे ते देवदर्शनासाठी आले होते.

Sadhus Beaten Up in Sangli | (Photo Credit -Twitter)

मुलं पळवणारी टोळी समजून सांगली जिल्ह्यातील जत येथे चार साधूंना बेदम मारहाण (Sadhus Beaten Up in Sangli) करण्यात आली आहे. जत (Jath) तालुक्यातील लवंगा (Lavanga ) गावात ही घटना घडली. सर्व साधू उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मथुरा (Mathura) येथील होते होते. कर्नाटक येथे ते देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन आटोपून पुढच्या तिर्थक्षेत्रासाठी ते निघाले असता त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. गावातील तरुणाने दिलेल्या माहितीवरुन गैरसमज झाल्याने ग्रामस्थांचा गैरसमज झाला आणि त्यांनी साधूंना बेदम मारहाण केली. दरम्यान, गावातीलच काही सजग नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली अशी माहिती स्थानिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

लवंगा येथील साधूंना झालेल्या मारहाणीच्या घटनेची नोंद उमदी पोलीसांनी घेतली आहे. मात्र, स्वत: साधूंनीच तक्रार द्यायला नकार दिल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला. पोलिसांनी काही काळ चौकशी करुन साधूंना पुढील प्रवासासाठी सोडून दिले. सांगितले जात आहे की, उमदी येथील एका तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला होता. या व्हिडिओत मुले चोरणारी एक टोळी साधूंच्या वेशात फिरत असल्याचे म्हटले होते. दरम्यान, या व्हिडिओचा प्रभाव झाल्याने या तरुणाने या साधूंना मुले चोरणारी टोळीच समजले आणि गावातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. (हेही वाचा, Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात राम मंदिराच्या साधूला मारहाण; 25 ग्रामस्थांवर FIR दाखल)

ट्विट

अधिक माहिती अशी की, मथुरा येथील या साधुंनी लवंगा गावातीलच एका मंत्रिरात रात्रीच्या वेळी मुक्काम केला. त्यानंतर सकाळी अन्हिक आटोपून हे साधू मार्गस्थ होण्यासठी आपल्या वाहनातून निघाले. दरम्यान, त्यांनी गावातीलच एका तरुणास रस्ता विचारला. या वेळी तरुणाला संशय आला की, ही मुलं चोरणारी टोळी असावी. दरम्यान, या साधूंना मराठी येत नव्हते परिणामी गावातील नागरिकांचा संशय अधिकच वाढला. त्यातून वादावादी सुरु झाली. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी या साधूंना बाहेरकाढून बेदम मारहाण केली. साधूंना लाकडी दांडके आणि पट्ट्याने जबर मारहाण होतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्विट

भाजप आमदार राम कदम यांनी सदर घटनेबाबत बोलताना ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आह की, ''सांगली मध्ये साधू संता सोबत जी दुर्दैवी मारहाण झाली. त्याच्यबरोबरच जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. महाराषट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत साधू संतांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही. पालघर हत्याकांडात निर्दोष साधुंवर तत्कालीन फेसबुक लाइव्ह मुखमंत्री आणि त्यांच्या सरकारने अन्याय केला. त्यांचा प्रखर हिंदू विरोध देशाने पहिला. मात्र वर्तमान सरकार हे साधू संतांचा सन्मान करणारे सरकार आहे. दोषींना कठोर शासन केले जाईल.