Sushant Singh Rajput प्रकरणी SM रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले स्वागत, लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार

ज्यानुसार, 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सोशल मिडिया रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. लवकरच आम्ही या बनावट सोशल अकाउंट्सचा खुलासा करू, ज्याला भाजपाचा IT विभागाने बनवले आहे. ज्यांचा उद्देश मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राला बदनाम करणे हा होता.' असे म्हटले आहे.

Congress Leader Sachin Sawant (PC - ANI)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) संशयित मृत्यूप्रकरणाचा आता हळूहळू उलगडा होत आहे. मात्र 14 जून ला सुशांतच्या निधनानंतर सोशल मिडियावर (Social Media) अनेक चुकीचे संदेश व्हायरल होऊ लागले. यामध्ये एक वेगळे सोशल मिडिया रॅकेट देखील समोर आले. या सर्वांचा विरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कडक पाऊल उचलले असून सुशांत विरोधी चुकीची माहिती पसरवणा-या बनावट अकाउंट्सचा तसेच मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करणा-या सोशल मिडियावरील लोकांचा मुंबई पोलिस तपास करणार आहे. या संदर्भात 2 FIR दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या या निर्णयाचे काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी स्वागत केले असून लवकरच या SM रॅकेटचा छडा लावला जाईल असे त्यांनी सांगितले.

सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ज्यानुसार, 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सोशल मिडिया रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. लवकरच आम्ही या बनावट सोशल अकाउंट्सचा खुलासा करू, ज्याला भाजपाचा IT विभागाने बनवले आहे. ज्यांचा उद्देश मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राला बदनाम करणे हा होता.' असे म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर मागच्या 100 दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार? शिवसेनेचा सवाल

प्रशांत भूषण यांनी देखील सुशांतच्या केस विरोधात इटली, जपान, थायलंड, फ्रान्स सह अनेक देशांमध्ये कॅम्पेन चालविण्यात आले होते. यात 80,000 हून अधिक बनावट अकाउंट्स बनविण्यात आले होते. अशी माहिती मिळत आहे. या सर्वांचा मुंबई सायबर क्राईम विभाग तपास करणार आहे.