IPL Auction 2025 Live

Shiv Sena on West Bengal Violence: ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जात आहे काय? शिवसेनेचा सवाल

जेथे भाजपाचे लोक निवडून आले आहेत त्याच भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, असे तृणमूलचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जात आहे काय?,” असा सवालही शिवसेनेने (Shiv Sena on West Bengal Violence) उपस्थित केला आहे.

BJP Vs TMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात विधानसभा निवडणुकीत सत्तांतर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मनसुबा बंगालच्या जनतेने उधळून लावला. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार नव्याने स्थापन झाले. दरम्यान, विधानसभा निवडणूक निकाल 2021 (Assembly Election Results 2021) नंतर पश्चिम बंगाल राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार (West Bengal Violence) सुरु असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे देशभरातील नेते करत आहेत. यावरुन शिवसेना ( Shiv Sena,) मुखपत्र दैनिक सामना (, Saamana Editorial) संपादकीयातून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपावाले रंगवतात तितके हिंसाचाराचे चित्र भेसूर नाही. जेथे भाजपाचे लोक निवडून आले आहेत त्याच भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, असे तृणमूलचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जात आहे काय?,” असा सवालही शिवसेनेने (Shiv Sena on West Bengal Violence) उपस्थित केला आहे.

सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे

तृणमूल काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. भाजपावाले रंगवतात तितके हिंसाचाराचे चित्र भेसूर नाही. जेथे भाजपाचे लोक निवडून आले आहेत त्याच भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, असे तृणमूलचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जात आहे काय?,” अशी शंका शिवसेनेने उपस्थित केली आहे.