Rutuja Latke | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ( Andheri Bypoll Result 2022) शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) मताधिक्य घेताना दिसत आहे. आज सकाळी आठ वाजलेपासून सुरु झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच लटके आघाडीवर आहेत. ऋतुजा लटके यांना तुल्यबळ उमेदवार पाहायला मिळत नाही. असे असल तरी 'नोटा' धक्कादायकरिरत्या मते मिळवताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नोटाला मिळणारी मते पाहता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना मताधिक्य परंतू, सामना 'नोटा'शी असे चित्र निर्माण झाले आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मतमोजणीच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. चारही फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके आघाडीवर तर 'नोटा' दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे. फेरीनिहाय निकाल खालील प्रमाणे. (हेही वाचा, Andheri Bypoll Result 2022: अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक निकाल आज जाहीर होणार, मतमोजणीस सुरुवात)

मतमोजणीची आकरावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -42343, बाळा नाडार -1052,मनोज नाईक - 622, मीना खेडेकर - 948,फरहा न सय्यद - 753,मिलिंद कां बळे - 455,राजेश त्रिपाठी - 1067

नोटा - 8379

एकूण - 55619

मतमोजणीची दहावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -37469, बाळा नाडार -975,मनो ज नाईक - 584, मीना खेडेकर - 898,फ रहान सय्यद - 720,मि लिंद कांबळे - 428, राजेश त्रिपाठी - 986

नोटा - 7556

एकूण - 49616

मतमोजणीची नववी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -32515, बाळा नाडार -897,मनोज नाईक - 543 , मीना खेडेकर - 863, फरहान सय्यद - 667, मिलिंद कांबळे - 409, राजेश त्रिपाठी - 889

नोटा - 6637

एकूण मतमोजणी - 43420

मतमोजणीची आठवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -29033, बाळा नाडार -819,मनोज नाईक - 458,मी ना खेडेकर - 789, फरहान सय्यद - 628, मिलिंद कांबळे - 358, राजेश त्रिपाठी - 787

नोटा - 5655

एकूण मतमोजणी - 38527

मतमोजणीची सातवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -24955, बाळा नाडार -733,मनोज नाईक - 416, मीना खेडेकर - 646,फरहा न सय्यद - 545, मिलिंद कांबळे - 312, राजेश त्रिपाठी - 679

नोटा - 4712

एकूण मतमोजणी - 32998

मतमोजणीची सहावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 21090, बाळा नाडार -674, मनोज नाईक - 398, मीना खेडेकर - 587, फरहान सय्यद - 448, मिलिंद कांबळे - 291, राजेश त्रिपाठी - 621

नोटा - 4338

एकूण - 28447

मतमोजणीची पाचवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 17278, बाळा नडार - 570,मनोज नाईक - 365,मी ना खेडेकर - 516, फरहान सय्यद - 378, मिलिंद कांबळे - 267, राजेश त्रिपाठी - 538

नोटा - 3859

एकूण - 23771

ट्विट

मतमोजणीची चौथी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 14648, बाळा नडार - 505, मनोज नाईक - 332, मीना खेडेकर - 437, फरहान सय्यद - 308, मिलिंद कांबळे - 246, राजेश त्रिपाठी - 492

नोटा - 3580

एकूण - 20548

मतमोजणीची तिसरी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 11361, बाळा नडार - 432,मनोज नाईक - 207,मीना खेडेकर - 2 81, फरहान सय्यद - 232, मिलिंद कांबळे - 202, राजेश त्रिपाठी - 410

नोटा - 2967

एकूण - 16092

मतमोजणीची दुसरी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 7817, बाळा नडार -339,मनोज नाईक -113 ,मीना खेडेकर -1 85,फरहान सय्यद -154, मिलिंद कांबळे - 136, राजेश त्रिपाठी - 223

नोटा -1470

एकूण -10437

मतमोजणीची पहिली फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके- 4277, बाला नाडार - 222,मनोज नाईक - 56, मीना खेडेकवर- 138,फरहान सय्यद- 103, मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127

नोटा -622

एकूण मत : 5624

एखाद्या विधानसभा पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान मिळण्याची राज्यातील बहुदा ही पहिलीच घटना असावी. दरम्यान, नोटाला मिळालेल्या मतदानावरुन आता चांगलेच राजकारण रंगले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अंधेरीमध्ये नोटाला मिळालेले मतदान हे भाजपचे असल्याचा दावा केला आहे. तर नोटाला मतदान ही स्थानिकांची भावना असावी असे भाजपने म्हटले आहे.