Mohan Bhagwat On Manipur violence: मणिपूर हिंसाचारातील बाह्य घटकांबद्दल चिंता- मोहन भागवत

मणिपूरमधील (Manipur Violence) अलीकडील हिंसाचारात सीमेपलीकडून अतिरेक्यांचा काही सहभाग आहे का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथील दसरा मेळाव्यात (Mohan Bhagwat from Dussehra Mela in Nagpur) बोलताना आपली चिंता मंगळवारी (24 ऑक्टोबर) व्यक्त केली.

Mohan Bhagwat | (Photo Credit - X/ANI)

मणिपूरमधील (Manipur Violence) अलीकडील हिंसाचारात सीमेपलीकडून अतिरेक्यांचा काही सहभाग आहे का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथील दसरा मेळाव्यात (Mohan Bhagwat from Dussehra Mela in Nagpur) बोलताना आपली चिंता मंगळवारी (24 ऑक्टोबर) व्यक्त केली. मणिपूर हिंसाचारातील बाह्य घटकांवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, हिंसा एकाएकी कशी भडकली? अशा संघर्षाचा फायदा बाह्य शक्तींना होतो. बाह्य घटक यात सामील आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रदेशातील (मणिपूर) मेईतेई आणि कुकी समुदायांच्या दीर्घकालीन शांततापूर्ण सहअस्तित्वावरही त्यांनी भर दिला.

'खऱ्या मार्क्सवादापासून ते दूर जात आहेत'

मणिपूरच्या मुद्द्यावर अधीक जोर देताना मोहन भागवत म्हणाले, ही हिंसा उत्स्फूर्त नसून ती भडकवलेली असू शकते. त्यांनी नमूद केले की, ही (हिंसा) घडत नाही, ती घडवली जात आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करणाऱ्या मणिपूरमधील संघ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना भागवत यांनी अस्मितेच्या राजकारणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. काही व्यक्ती जे स्वतःला "सांस्कृतिक मार्क्सवादी" किंवा "जागे" (woke) असे लेबल लावतात ते मार्क्सवादाच्या खऱ्या सारापासून विचलित झाले आहेत. आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी मत मिळविण्याच्या फायद्यासाठी सार्वजनिक भावना हाताळण्याच्या प्रयत्नांपासून सावधगिरी बाळगली. त्याऐवजी एकता, अखंडता, अस्मिता आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास या मूल्यांचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

व्हिडिओ

दरम्यान, येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. त्या दिवशी, भारतीय उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये कार्यक्रम आयोजित करू शकतात. या वेळी सर्वांनाच अयोध्या येथील कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव काही निर्बंध असतील. मात्र, काही काळानंतर सर्वजन आपापल्या सोईने अयोध्येत जाऊ शकतात, असेही भागवत म्हणाले.

व्हिडिओ

सप्टेंबरमध्ये भारताने आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेवर भागवत म्हणाले की, शिखर परिषदेतील प्रतिनिधींनी विविधतेत भारताची एकता अनुभवली. देशात मंगळवारी दुर्गापूजेच्या समाप्तीनिमित्त विजयादशमी, ज्याला दसरा म्हणूनही ओळखले जाते, साजरी केली जात आहे. त्याचेच औचित्य साधून भागवत बोलत होते.