अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर रोहित पवार यांनी दिली 'अशी' प्रतिक्रीया (View Tweet)

त्या गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Amruta Fadnavis and Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या त्यांच्या गाण्यामुळे अलिकडच्या काळात प्रकाशझोतात आल्या आहेत. सातत्याने नवीनवी गाणी चाहत्यांच्या भेटीला आणणाऱ्या अमृता यांनी महिला दिनानिमित्त एक विशेष गाणं रिलीज केलं. त्या गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच गाण्याची अशीच आवड जोपासा म्हणत शुभेच्छाही दिल्या आहेत. (अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवे गाणे; Women's Day 2021 निमित्त चाहत्यांना नवी भेट, Watch Video)

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीसताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!"

रोहित पवार ट्विट:

महिला दिनाचं औचित्य साधत अमृता फडणवीस यांनी 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी,' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले. स्वप्ना पटकर यांनी लेखणीतून हे गाणे साकारले असून 'रोहन रोहन' यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. विशेष म्हणजे हे गाणे नाट्य संगातीवर आधारीत आहे. दरम्यान, या गाण्यावर संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहेत.