Vasai News: लपाछपी खेळताना 14 वर्षाच्या मुलाच्या हातात घुसला टोकेरी रॉड, वसई येथील घटना

वसई परिसरात लपाछपी खेळत असताना, एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्रीच्या वेळीस खेळत असताना १४ वर्षाच्या मुलाच्या दंडातून रॉड घुसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Vasai News: लपाछपी खेळताना 14 वर्षाच्या मुलाच्या हातात घुसला टोकेरी रॉड, वसई येथील घटना
gate

Vasai News: वसई (Vasai) परिसरात लपाछपी खेळत असताना, एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्रीच्या वेळीस खेळत असताना १४ वर्षाच्या मुलाच्या दंडातून रॉड (Rod) घुसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वसईतील गायत्री मंदिराजवळ ही घटना घडली. सोमेध जाधव असं त्याचं नाव आहे. तो सद्या नववीचे शिक्षण घेत आहे.अनेकदा कामामुळे पालकांच मुलांकडे दुर्लक्ष होत असतं आणि दरम्यान मुलांसोबत घात होतो.

मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील गायत्री मंदिरात खेळताना ग्रीलच्या वरिल रॉड मुलाच्या खांद्याच्या खाली हातात शिरला. लपाछपी खेळत असतना तो लोखंडी गेटवरून पलीकडे उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना सोमेधचा हातात रॉड घुसला आणि तो तिथंच अडकून पडला. लोंखडाच्या गेटवरून चढला आणि दुसऱ्या बाजूला उतरत असताना त्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय सटकला तोल गेला आणि लोखंडी सळईवर पडला.

तो सळईवर पडला असताना, टोकेरी सळई त्याच्या हातात घुसला. सुमेधच्या हातात सहा इंचाचा रॉड घुसला. त्याने आरडाओरड केल्यानंतर जमाव जमला. त्यानंतर नागरिकांनी लोंखड कापण्याच्या मशिनने तो रॉक कापून,सुमेधला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि दंडातला रॉड काढण्यात यश मिळवलं. सुमेधची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2023 09:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).