Navi Mumbai Robbery: खारघर येथील सोन्याच्या दुकानात दरोडा, ११ लाख रुपयाचे दागिने चोरीला, तीन आरोपी फरार

तिघे जण हेल्मेट घालून दुकानात आले

navi mmubai robbery PC TW

Navi Mumbai Robbery:  नवी मुंबईतील खारघर परिसरात तीन चोरट्यांनी एका सोन्याच्या दुकानातून ११ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिघे जण हेल्मेट घालून दुकानात आले आणि त्यांना दुकन मालक आणि कर्मचाऱ्यांना बंदूकीची धाक दाखवत चोरी केली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- Sangli Reliance Jewels Showroom वर सशस्त्र दरोडा, 14 कोटी रुपयांचे दागिने लंपास; दरोडेखोर बॅग विसरल्याने हिरे सलामत)

मिळालेल्या माहितीनुसार, खारघर येथील सोन्याच्या दुकानात तीन चोरट्यांनी दरोडा टाकला. तिघांन्ही हेल्मेट घालून दुकानात प्रवेश केला. बंदूकीचा धाक दाखवत वॉचमॅन आणि कर्मचाऱ्यांना रोखले. त्यांनंतर तिघांन्ही गोळीबार केला. तीन मिनिटांत त्यांनी चार ते पाच राऊंड गोळ्या झाडल्या. यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ 

दरोड्यांनी तब्बल ११.८० लाख रुपयांचे दागिने लुटले. चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या आरोपींवर गुन्हा दाखल केला. चोरीच्या घटनेनंतर स्थानिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. आरोपींचा शोध सुरु आहे.