Sinhagad Fort: पुण्यात सिंहगड घाटात कोसळली दरड; किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद(Watch Video)

सध्या तेथे दरड हटवण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद झाला आहे.

Photo Credit- X

Sinhagad Fort: राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस (Rain)पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. पुणे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथे वाहणारे धबधबे, भुशी डॅम, गडकिल्ले आकर्षणाचे केंद्रस्थान राहिले आहेत. अशातच, सिंहगड घाटात दगड कोसळल्याची घटना घडली आहे. सध्या तेथे युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू आहे. सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort)जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग, मोठ्या झाडांसह कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद झाला असून वन विभागाकडून देखील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र, दगड आणि मातीचं प्रमाण मोठं असल्यानं ही दरड हटवण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवली आहे.(हेही वाचा:Yavatmal Video: ओढा ओलांडणारा शेतकरी बैलगाडीसह पाण्यात वाहून गेले, यवतमाळ जिल्ह्यातील घटना )

मागील दहा-बारा दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. विशेष म्हणजे गेल्या 32 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद गेल्या आठवड्यात झाली. या पावसाचं पाणी पुण्यातील (Pune) अनेक भागांत शिरलं होतं, अनेकांच्या घरात, कॉलनीत पावसाचे पाणी शिरले होते. सध्या असलेला मुसळधार पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे.

दरड कोसळल्याचा व्हिडीओ

सिंहगड पर्यटनाचे केंद्रबिंदू

पुण्यातील सिंहगड किल्ला हे नेहमीच पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटकांची पावले खडकवासला, सिंहगडाकडे वळतात. पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पावसाळ्याच्या दिवसांत कायम पर्यटकांची रेलचेल असते. मात्र कधी कधी दरड कोसळल्याने रस्ता बंद होतो. त्यामुळे पर्यटक अडकून राहिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.