गरब्यावरुन येणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक
अंधेरी पूर्व येथील साकीनाका येथून रात्री गरबा संपवल्यावर घरी येण्यास निघालेल्या 11 वर्षीय मुलीवर नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घडना गुरुवारी रात्री घडली आहे.
अंधेरी पूर्व येथील साकीनाका येथून रात्री गरबा संपवल्यावर घरी येण्यास निघालेल्या 11 वर्षीय मुलीवर नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घडना गुरुवारी रात्री घडली आहे. तर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
साकीनाका येथे राहणारी पीडित मुलगी तिच्या घराजवळ आयोजित केलेल्या गरब्याच्या ठिकाणाहून रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घरी येत होती. तितक्यात दारुच्या नशेत असलेल्या एका ट्रक चालकाने तिला एकटीला घरी जाताना पाहिले. त्यांनतर हा चालक तिला रस्त्यामध्ये अडवून एका जास्त वर्दळ नसेलल्या ठिकाणी जबरदस्तीने घेऊन गेला. तसेच या नराधमाने तिच्यावर 30 मिनिटे बलात्कार करुन तेथून पसार झाला. ही पीडित मुलगी त्याच अवस्थेत घरी पोहचून तिने घरातील मंडळींना झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले. त्यावेळी घरातील मंडळींनी त्वरीत पोलिसात या घटनेबद्दल गुन्हा दाखल केला.
तर साकीनाका पोलिसांनी वेळेचा विलंब न लावता या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीचा शोध लावून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच या आरोपीने आपण केलेला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून स्वत: चा चेहरामोहरा बदलून टाकला होता.