Retired Navy Officer Beaten in Maharashtra: नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जामीन दिल्याने आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि मुलीकडून आंदोलन

Protest outside the office of Additional Commissioner of Police (Photo Credits-ANI)

मुंबईतील नौदलातील माजी अधिकारी मदन शर्मा यांनी व्हॉट्सअॅपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र असणारा मेसेज फॉरवर्ड केला असता त्यांना शिवसेनेच्या 8-10 कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणा शिवसेना कार्यकर्ता कमलेश कदम याच्यासह पाच जणांना काल ताब्यात घेतल्यानंतर आज समता नगर पोलीस स्थानकातून जामीन देण्यात आला. या प्रकरणी आता माजी अधिकाऱ्यांची मुलगी शिला शर्मा आणि भाजप नेते यांच्याकडून अतिरिक्त पोली आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आरोपींवर अजमीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सुद्धा मागणी केली जात आहे.

या प्रकरणी मदन शर्मा यांनी असे म्हटले की, आपल्या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. व्हॉट्सअॅप हे एखाद्या सोबत जोडण्यासह तेथे काही माहिती सुद्धा शेअर करता येते. तर सरकारने यासाठी काही तरी पाऊल उचलावे आणि मेसेज कुठून आला आहे त्याचा सुद्धा तपास करावा असे मदन शर्मा यांनी म्हटले आहे. तर आता आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.(Retired Navy Officer Beaten in Maharashtra: नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ता कमलेश कदमसह अन्य पाच जणांना जामीन)

जेष्ठ नागरिकावर हल्ला करण्यात आला असून पोलिसांनी कायद्याच्या कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा हे त्यांना माहित असावे. आरोपींना खुनाच्या आरोपाखाली अटक झाली पाहिजे. हे अजामीनपात्र असलेच पाहिजे असल्याचे शिला शर्मा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय दुःखद असल्याचे ट्वीट केले आहे. ते म्हणतात, ‘एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याने व्हाट्सएपवर संदेश पाठविल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवा. आम्ही या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.’ असे त्यांनी ट्वीट करत म्हटले होते.