Arnab Goswami in Maharashtra Police Custody: रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्नब गोस्वामी यांना अटक

5 मे 2018 या दिवशी त्यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. याच ठिकाणी त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह याच ठिकाणी आढळून आला होता.

Arnab Goswami | (File Photo)

Arnab Goswami in Maharashtra Police Custody: 'रिपब्लिक' चॅनलचे संपादक अर्नब गोस्वामी (Republic Channel editor Arnab Goswami) यांना पनवेल पोलिसांनी (Panvel Police) राहत्या घरातून अटक केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. अर्नब गोस्वामी (Arnab Goswami)) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर केले जाणार आहे.  रिपब्लिक चॅनलने (Republic Channe) दिलेल्या वृत्तात मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या अटकेनंत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मात्र चांगलेच राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु झाल्या आहेत.

काय आहे अन्वय नाईक प्रकरण?

पेशाने वास्तुविशारद असलेले अन्वय नाईक कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. 5 मे 2018 या दिवशी त्यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. याच ठिकाणी त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह याच ठिकाणी आढळून आला होता.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली. या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांचे नाव होते. अर्नब गोस्वामी यांनी यांनी पैसै थकवल्याचा आरोप करत आपल्या आत्महत्येला गोस्वामी यांना जबाबदार ठरले होते. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यात अर्नब गोस्वामी यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा, आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीची होणार पुन्हा चौकशी; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश)

अक्षता नाईक यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, रिपब्लिक टीव्ही स्टुडिओ उभारण्याचे काम अन्वय नाईक यांच्या कंपनीने केले होते. या कामाचे बरेच पैसै अर्णब गोस्वामी यांनी थकवले होते. त्यामुळेच अन्वय नाईक यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असा आरोप अक्षता नाईक यांनी केला होता.

दरम्यान, अक्षता नाईक यांनी 5 मे 2020 या दिवशी एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात अन्वय नाईक यांच्या हत्येला एक वर्ष झाले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तरीही या प्रकरणात कोणताही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी या व्हिडिओत केला होता.