Rental Income Rise In Indian Cities: भारतातील प्रमुख शहरांमध्ये भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नात लक्षणीय वाढ- अहवाल

Housing Marke In Indian: प्रमुख भारतीय शहरांमध्ये भाड्याच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरांतील भाड्याचे उत्पन्न वार्षिक आधारावर 14.6% आणि तिमाही आधारावर 2.6% ने वाढले असल्याचे पुढे आले आहे मॅजिकब्रिक्स (Magicbricks) या अग्रगण्य रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म ताजा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. ज्यामध्ये शहरी अर्थकारणातील एक महत्त्वाची घडामोड ठळकपणे नोंदविण्यात आली.

Rental Income | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Housing Marke In Indian: प्रमुख भारतीय शहरांमध्ये भाड्याच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ (Rental Income Rise In Indian Cities) झाली आहे. शहरांतील भाड्याचे उत्पन्न वार्षिक आधारावर 14.6% आणि तिमाही आधारावर 2.6% ने वाढले असल्याचे पुढे आले आहे मॅजिकब्रिक्स (Magicbricks) या अग्रगण्य रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म ताजा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. ज्यामध्ये शहरी अर्थकारणातील एक महत्त्वाची घडामोड ठळकपणे नोंदविण्यात आली.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मॅजिकब्रिक्सचे संशोधन प्रमुख अभिषेक भद्रा यांनी म्हटले की, आर्थिक कृती आणि व्यवहार शिगेला पोहोचल्याने, भाड्याची मागणी आणि घर भाडे अल्प ते मध्यम कालावधीत वाढत राहणे अपेक्षित आहे. याशिवाय, बांधकामाधीन मालमत्तेचा साठा पूर्णत्वास येत असल्याने भाड्याच्या युनिट्सचा पुरवठा सुधारणे अपेक्षित आहे. एकूणच, सध्याचा काळ जमीनमालक आणि गुंतवणूकदारांसाठी (Investment) एक आशादायक संधी उपलब्ध करत आहे. ज्यामुळे भाडे बाजारामध्ये अधिक सहभागास प्रोत्साहन मिळते, असे ते पुढे म्हणाले. (हेही वाचा, Prime International Residential Index: जगभरातील प्राइम प्रॉपर्टी असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई 37 व्या स्थानी, न्यू यॉर्क, लंडन, शांघायला टाकले मागे, See List)

भाडेवाढीत आघाडीवर असलेली प्रमुख शहरे

नवी मुंबई, हैदराबाद आणि अहमदाबाद यांनी तिमाही आधारावर सरासरी भाड्यात सर्वात लक्षणीय वाढ दर्शविली आहे. नवी मुंबईत 6.2% वाढ झाली असून, जानेवारी-मार्च २०२४ मध्ये सरासरी भाडे 28.99 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना तर एप्रिल-जून २०२४मध्ये 30.38 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना झाले. हैदराबादमध्ये प्रति चौरस फूट 4.2% भाडे वाढ झाली. हे भाडे 22.01 वरून 22.93 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना वाढले. हमदाबादमध्ये 4% भाडेवाढ झाली. या शहरात सुमारे 17.25 रुपये प्रति चौरस फूट वरून ते 17.94 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना इतके वाढले. (हेही वाचा, Post Office RD: पोस्टात आरडी केल्यास किती मिळतो परतावा? पाच वर्षांसाठी 5000 गुंतवल्यास किती फायदा? घ्या जाणून)

वाढती मागणी आणि घटता पुरवठा

मागील तिमाहीत 16% वाढीनंतर या कालावधीत भाड्याच्या मागणीत लक्षणीय 14.8% त्रैमासिक वाढ नोंदवली गेली आहे. तथापि, उच्च शोषण दरांमुळे भाड्याच्या मालमत्तेचा पुरवठा शहरांमध्ये तिमाही दराने 2.2% कमी झाला आहे, ज्यामुळे भाड्यात वाढ झाली आहे.

सर्वाधिक भाडे असलेली शहरे

मुंबई (रु. 82.28 प्रति चौरस फूट प्रति महिना), दिल्ली (रु. 33.72 प्रति चौरस फूट प्रति महिना), आणि ठाणे (रु. 29.84 प्रति चौरस फूट प्रति महिना) येथे सर्वाधिक भाडे दर आढळतात. ग्रेटर नोएडामध्ये, सरासरी भाडे 14.52 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना आहे, तर नोएडामध्ये ते 20.10 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना आहे आणि बेंगळुरूमध्ये ते 28 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना आहे.

आकर्षक गुंतवणूक बाजार

उच्च भाड्याची मागणी आणि वाढत्या भाड्यांमुळे निवासी रिअल इस्टेट हे एक फायदेशीर गुंतवणूक बाजार बनत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. टॉप 13 शहरांमधील सरासरी भाडे उत्पन्न 3.6% आहे, अहमदाबाद, पुणे आणि कोलकाता येथील गुंतवणुकीमध्ये सर्वाधिक भाडे उत्पन्न 3.8% आहे.

मॅजिकब्रिक्स बद्दल

मॅजिकब्रिक्स हे मालमत्तेच्या खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी एक व्यासपीठ आहे. ज्यामध्ये 1.5 दशलक्ष मालमत्ता सूचीचा सक्रिय आधार आहे. प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना आणि घरमालकांना रिअल इस्टेट मार्केटमध्ये माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन आणि डेटा ही संस्था प्रदान करते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement