COVID19: महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण 4743 जणांना कोरोनाची लागण; आतापर्यंत 59 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होता दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.
कोरोना विषाणू (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होता दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) आणखी 77 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आणखी 2 कर्मचाऱ्यांचा आज मृत्यू झाला आहे. ज्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या 4 हजार 743 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत 59 कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे. ज्यामुळे पोलीस प्रशासनापुढे कोरोनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस कर्मचारी महत्वाची महत्वाची भुमिका बजावत आहेत. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या कामगिरीची कौतूकही केले जात आहे. हे देखील वाचा- Mumbai Police Uses 'Know a Spot' Trend: 2 किमी पेक्षा जास्त अंतरावर गाडी नेल्यास मुंबई पोलिसांकडून होऊ शकते कारवाई, ट्विटद्वारे दिली चेतावणी
एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात रविवारी संध्याकाळपर्यंत 5493 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून 156 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 164626 अशी झाली आहे. तर, दिवसभरात 2330 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 86575 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तसेच सध्या राज्यात एकूण 70607 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी महिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.