Reliance Industries Chairman Mukesh Ambani यांना तिसरा धमकीचा इमेल; खंडणीची रक्कम आता 400 कोटी

आता इमेलला उत्तर न मिळाल्याचं सांगत त्याच इमेल आयडी वरून तिसरा मेल पाठवत खंडणी वाढवण्यात आली आहे.

Mukesh Ambani | (File Image)

Reliance Industries चे चेअरपर्सन Mukesh Ambani यांना तिसरा जीवे मारण्याच्या धमकीचा इमेल आला आहे. यामध्ये आता खंडणीची रक्कम वाढवून 400 कोटी करण्यात आली आहे. यापूर्वी 27 ऑक्टोबरला दोन इमेल पाठवत खंडणीखोराने 200 कोटींची मागणी केली होती. आता इमेलला उत्तर न मिळाल्याचं सांगत त्याच इमेल आयडी वरून तिसरा मेल पाठवत खंडणी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये याप्रकरणी गावदेवी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असल्याचं सांगण्यात आलं आहे.

खंडणीच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुकेश अंबानींच्या दक्षिण मुंबई मधील राहत्या घरी मुंबई पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. पहिला इमेल 27 ऑक्टोबरला पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये इमेल द्वाअरा धमकी देताना 20 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. जर 20 कोटी मिळाले नाही तर गोळ्या झाडून ठार केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. 28 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांना त्याच ईमेल खात्यावरून आणखी एक जीवे मारण्याची धमकी मिळाली. यावेळी ईमेल मध्ये मागील ईमेलला प्रतिसाद न मिळाल्याचे कारण देत आपली मागणी ₹20 कोटींवरून ₹200 कोटी केली असल्याचं म्हटलं आहे.

पहिल्या धमकीनंतरच अंबानींच्या सिक्युरिटी इन चार्जच्या तक्रारीच्या आधारे, मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अंबानी कुटुंबाला खंडणीची धमकी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.