Rekha Jare Murder Case: मुख्य सूत्रधार बाळ बोठे ला हैदराबाद मधून 3 महिन्यांनी अटक
मीडीया रिपोर्ट्सनुसार बाळ बोठे याला हैदराबाद येथून अटक करण्यात आहे.
अहमदनगरच्या सामजिक कार्यकत्या रेखा जरे (Rekha Jare) यांच्या हत्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे (Bal Bothe) यांना अखेर अटक झाली आहे. हत्या झाल्यानंतर तब्बल 3 ते साडे तीन महिन्यांनंतर बाळ बोठे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिस प्रशासनाला यश आलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार बाळ बोठे याला हैदराबाद येथून अटक करण्यात आहे. दरम्यान बाळ बोठे सोबतच त्याला मदत करणार्या 3 अन्य लोकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. Woman NCP Activist Rekha Jare Murder: अहमदनगर मध्ये एनसीपी कार्यकर्त्या रेखा जरे यांच्यावर प्राणघातक हल्ला; उपचारापूर्वीच मृत्यू.
अहमदनगर मध्ये पोलिसांकडून बाळ बोठे फरार घोषित करण्यात आला होता. त्याच्याकडून कोर्टात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनांंनादेखील फेटाळून लावण्यात आले आहे. बाळ बोठे यांनी दिलेल्या सुपारीवरून रेखा जरे यांची हत्या झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
30 नोहेंबर 2020 दिवशी रेखा जरे यांचा अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यात जातेगाव घाटात गळा चिरून खून करण्यात आला. या प्रकरणी जरे यांच्या आईने फिर्याद दिल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेखा जरे यांच्यावर हल्ला करणा-या दोघांपैकी एकाचा फोटो जरे यांच्या मुलाने काढला होता. त्याच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला. महाराष्ट्रातून पसार झालेला बाळ बोठे हैदराबाद मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळताच 5 विविध पथकांच्या मार्फत त्याचा शोध घेऊन बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. बाळ बोठे हा पत्रकार आहे. कार्यकारी संपादक म्हणून तो काम करत होता.
दरम्यान बाळ बोठे याला घर भाड्याने मिळवून देणे, मोबईल फोन देणे, पैसे पुरवणे अशा प्रकरची मदत करणार्या आरोपींना देखील बाळ बोठे सोबत अटक झाली आहे. त्याच्या अटकेची कारवाई गोपनीय पद्धतीने झाल्याने आज महाराष्ट्रात त्याला आणल्यानंतर पोलिस या बाबत अधिक देणार आहेत.