कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांना Fight Against Coronavirus मध्ये सहभागी होण्याची संधी; रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी BMC कडून खास Email ची सोय

मात्र या लढ्यात नागरिकांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. दरम्यान आता कोरोना संसर्गापासून मुक्त झालेल्या कोरोना रुग्णांनाही कोरोना लढ्यात सहभागी होता येणार आहे.

Image For Representation (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा विस्तार दिवसागणित वाढत असल्याने कोरोना विरुद्धचा लढा अधिकाधिक तीव्र होत आहे. महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र या लढ्यात नागरिकांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. दरम्यान आता कोरोना संसर्गापासून मुक्त झालेल्या कोरोना रुग्णांनाही कोरोना लढ्यात सहभागी होता येणार आहे. कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरात कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी अॅन्टीबॉडीज (Antibodies) तयार झालेल्या असतात. त्यामुळे अशा रुग्णांचे रक्त आणि plasma मुळे कोरोना पासून संरक्षण मिळू शकतं. म्हणून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनातून पूर्णपणे रिकव्हर झालेले रुग्ण 4 आठवड्यांनंतर रक्तदान करु शकतात.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याची ही एक संधी असून इच्छुकांसाठी इमेल आयडी देण्यात आला आहे. तुम्हाला रक्तदान करुन कोरोना विरुद्धच्या लढ्यात भाग घ्यायचा असल्यास plasmadonationCOVID19@gmail.com तुम्ही संपर्क करु शकता. (रक्तदान करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या)

BMC Tweet:

लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक घरात असल्याने हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे यापूर्वी अनेकदा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. तर आता अजय देवगण, ऋतिक रोशन या सेलिब्रेटींनीही कोरोनाचा संसर्ग होऊन बरे झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे एकूण 2724 रुग्ण असून त्यापैकी 304 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 132 रुग्णांना कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.