Mumbai Rains: मुंबईत पावसाने गुरुवारी तोडला विक्रम, डिंसेंबर महिन्यातील सर्वाधिक 90 मिमी पावसाची नोंद

हा पाऊस सर्वसामान्य नाही. हा पाऊस विक्रमच करत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात या पावसाने दमदार हजेरी लावली. तशीच हजेरी मुंबईतही लावली आहे. मुंबईतील (Mumbai) पावसाने तर गुरुवारी (2 डिसेंबर) विक्रमच केला.

Delhi Rain (Pic Credit - ANI Twitter)

डिसेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. हा पाऊस सर्वसामान्य नाही. हा पाऊस विक्रमच करत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात या पावसाने दमदार हजेरी लावली. तशीच हजेरी मुंबईतही लावली आहे. मुंबईतील (Mumbai) पावसाने तर गुरुवारी (2 डिसेंबर) विक्रमच केला. या पावसाने मुबईत डिसेंबर महिन्यात या आधी पडलेल्या सर्व पावसांचे रेकॉर्ड ब्रेक (Highest Rain Fall in December) केले आहे. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदिनुसार पर्जन्यमापकामध्ये 90 मिमी पावसाची नोंद मुंबईत गुरुवारी झाली. मुंबईत मुसळधार पाऊस विक्रमी बरसत असताना तापमान 24.8 डिग्री सेल्सिअस इतके होते.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्यात होतो आहे. मुंबईत सर्वाधिक पाऊस पडतो आहे. हा पाऊस शहरात डिसेंबर महिन्यात पडलेल्या सर्व पावसाचे विक्रम मोडतो आहे. या आधी हवामान विभागाच्या सांताक्रुझ येथील पर्जन्यमापक यंत्रात ध्ये 91.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या आधी 6 डिसेंबर 2017 ला मुंबईत पडलेल्या विक्रमी पावसाची नोंद 53.8 मिमी इतकी आहे. त्या वेळी मुंबईत 24 तास पाऊस पडत होता. त्याच वर्षी मुंबईत डिसेंबर महिन्यातच 75.8 मिमी पाऊस पडल्याचीही नोंद आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Alert: हुडहुडी भरवणारा गारठा आणि पावसाची रिपरिप दोन्ही कायम; जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामान अंदाज)

डिसेंबर 2021 मध्ये मुंबईत झालेल्या पावसाच्या नोंदी

अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठाच फटका बसला आहे. आता किमान रब्बी हंगामात तरी निसर्ग साथ देईल, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, त्या आशेवरही पावसाचे पाणी फिरले. अवकाळीने शेतकऱ्यांच्या द्राक्ष, टोमॅटो, कांदा या व्यापारी पिकांचे नुकसान केलेच. शिवाय हरबरा, मका आदी पिकांनाही फटका बसला. याशिवाय बाजारपेठेत विक्रियोग्य झालेला भाजीपालाही शेतात पडून आहे. फुलशेतीचेही मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळते आहे.