Ahmednagar Kalyan Accident: बेपर्वा! टर्न घेताना भरधाव कारची धडक, दुचाकीचा अपघात (Watch Video)

भरधाव कारने दुचाकीने उडवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे

kalyan Accident PC TW

Kalyan Accident: अहमदनगर - कल्याण महामार्गावर (Ahmednagar Kalyan Accident) अपघातांची मालिका सुरु आहे. भरधाव कारने दुचाकीने उडवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवले आहे. दोघे जण १० फूट अंतरापर्यंत हवेत उडाले. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु दोघे जण जखमी झाले आहे.( हेही वाचा- दिवसाढवळ्या विद्यार्थींनीला लुटण्याचा प्रयत्न फसला, तिघे जण अटकेत)

सीसीटीव्हीत दिसल्याप्रमाणे, रस्त्यावरून जात असातना दुचाकी टर्न घेत होती परंतु तेवढ्यात मागून भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. मागून भरधाव कार येत असल्याचा अंदाजा दुचाकीस्वाराला आला नसावा. ही धडक इतकी भीषण होती की, दोघे ही दुचाकीवरून थेट काही फुट अंतरावर उडाले. अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ परिस्थिती निर्माण झाली. ही घटना अहमदनगर कल्याण पिंपरी पेंढारे येथे घडली.

पाहा व्हिडिओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by SaamTvNews (@saamtvnews)

दुचाकीवर पती पत्नी कामानिमित्त बाहेर जात होते त्यावेळीस ही घटना घडली. जखमी जोडप्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळच्या शासकिय रुग्णालयात दोघांवर उपचार सुरु आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. जुन्नर येथील आळेफाटा जवळील पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. शुक्रवारी एका भरधाव ट्रकने नागरिकांना उडवले त्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला.