Reasons of Victory of The Maha Yuti: महायुतीच्या विजयाची कारणे कोणती? उदासीन मतदार, भ्रामक प्रचार?

भाजप आणि महयुतीस विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मिळालेल्या यशाचे अनेक जाणकार विश्लेषण (Reasons of Maha Yuti Victory) करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने विश्लेष करत आहे. दरम्यान, भाजप आणि मरायुती यांच्या विजयाचे काही महत्त्वाच्या पैलूंवर भाष्य केले जात आहेत. ते पुढीलप्रमाणे:

Maha Yuti | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र विधानसभा नवडणूक निकाल (Assembly Election Results 2024) अनेकांसाठी धक्कादायक आहेत. काही प्रमाणात ते सत्ताधारी आणि बऱ्याच प्रमाणात विरोधकांसाठीही. राज्यात महायुती म्हणजेच भाजप (BJP), शिवसेना (शिंदे), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांना या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. या यशाचे अनेक जाणकार विश्लेषण (Reasons of Maha Yuti Victory) करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने विश्लेष करत आहे. दरम्यान, भाजप आणि मरायुती यांच्या विजयाचे काही महत्त्वाचे पैलूंवर भाष्य केले जात आहेत. ते पुढीलप्रमाणे:

धार्मिक आणि भ्रामक मुद्द्यांवर विरोधक निष्प्रभ

निवडणूक प्रचारात आर्थिकारण, विकास, बेरोजगारी, शिक्षण यांसारखे मुद्दे महत्त्वाचे असताना भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने अचानक सूकाणू बदलला. जो ते धार्मिक मुद्द्यांवर घेऊन गेले. 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' अशा मुद्द्यांना हात घालत लोकांना सरळ सरळ संभ्रमित करण्यात सत्ताधारी यशस्वी ठलले. सत्ताधाऱ्यांनी प्रचारात आणलेल्या धार्मिक मुद्द्यांवर उत्तर देणे विरोधकांना फार प्रभावीपणे जमले नाही. त्यामुळे आक्रमक हिंदूत्त्वाचा मुद्दाही महायुतीच्या यशात महत्त्वाचा ठरला. (हेही वाचा, Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणूक निकाल, गिरीश महाजन, कालिदास कोळंबकर, आदिती तटकरे यांच्यासह कोण कोण जिंकले? घ्या जाणून)

निवडणूक प्रचारात समस्या आणि लोकहिताच्या मुद्द्यांना बगल

राज्यातील जनतेलाही लोकशाही देशातील निवडणूक प्रक्रिया निटशी कळली आहे, असे अनेक राजकीय आणि सामाजिक विश्लेशक मानत नाही. त्याचे कारण असे की, दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपणास निवडणूक काळात शोधता येऊ शकतात. सत्ताधारी वर्गास आपणास भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, आरोग्याच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या,पर्यावरण आदींबाबत निवडणूक प्रचारात प्रश्न विचारावे असे सामान्य नागरिकांनाही वाटत नाही. परिणामी लोकहिताच्या मुद्द्यांवर निवडणुका लढल्याच जात नाहीत. विरोधकही हे प्रश्न हव्या त्या प्रमाणात लोकांसमोर घेऊन जात नाहीत किवा त्यात कमी पडतात. विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रचारात हे प्रकर्षाने जाणवले. त्याचाच फायदा सत्ताधारी वर्गास झाला असे मानण्यास जागा आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महायुती सरकार स्थापन करण्याच्या तयारीत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष (Watch Video))

निवडणूक काळात चाललेले प्रचंड अर्थकारण

पाठिमागील काही काळापासून केवळ राजकीय पक्षच नव्हे तर सर्वच उमेदवरांसाठी निवडणूक प्रचंड खर्चिक होते आहे. असे असताना निवडणूक काळात ओतला जाणारा पैसा हा सामाजिक चिंतेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आर्थिक खर्च प्रचंड प्रमाणावर करताना दिसले. अर्थात हे सर्व खर्च निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार दाखविण्यात आले असले तरी, त्या काळात निघणाऱ्या रॅली, सभा, मेजवाण्या आणि होणारा डिजिटल प्रचार बरेच काही सांगून जाणारा होता. त्या तुलनेत विरोधकांकडे संसाधनाचा प्रचंड अभाव असल्याचे सुरुवातीपासूनच जाणवत होते. त्याचाही फायदा भाजप आणि सत्ताधारी महायुतीस झाला, असे दिसते.

जातीय ध्रुविकरण

राज्याच्या समाजकारणात कधी नव्हे ते इतक्या प्रमाणावर जातीय ध्रुविकरण पाहायला मिळाले. एका बाजूला मराठा आरक्षण मुद्दा घेऊन संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील, दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे प्रा. लक्ष्मण हाके आणि इतर.. शिवाय छगन भुजबळ यांनी ओबीसी मुद्यांवर घेतलेली भूमिका.. दरम्यानच्या काळात प्रा. हाके यांनी भाजप आणि महायुतीस दिलेले समर्थन याचाही मोठा प्रभाव या निवडणुकीत पाहायला मिळाला. मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा नेमका कोणास झाला? याबाबत मतमतांरे असली तरी, सामाजिक ध्रुविकरणाचा बऱ्यापैकी फायदा सत्ताधाऱ्यांना झाल्याचे दिसते.

दरम्यान, लाडकी बहीण, वृद्धांना आर्ध्या दरात बसप्रवास, महिलांना मोफत बस प्रवास यांसारके काही मुद्देही महत्त्वाचे ठरले. ज्यामुळे महायुती आणि भाजपला फायदा होताना दिसला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now