IPL Auction 2025 Live

एकनाथ खडसेंऐवजी मुक्ताईनगरमधून भाजपचं तिकीट मिळवणारी रोहिणी आहे तरी कोण? वाचा संपूर्ण माहिती

एकनाथ खडसे यांचे तिकीट कापले असले तरी त्यांच्या कन्येला म्हणजेच रोहिणी खडसे यांना जळगाव येथील मुक्ताईनगर विभागातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Eknath Khadse, Rohini Khadse (Photo Credits: Facebook)

अखेर भाजप पक्षाने आज चौथी व अंतिम उमदेवार यादी जाहीर केली आणि आश्चर्याची बाब म्हणजे याही यादीत विनोद तावडे, एकनाथ खडसे किंवा प्रकाश मेहता यांसारख्या बड्या मंडळींची नावे वगळण्यात आली आहेत.

एकनाथ खडसे यांचे तिकीट कापले असले तरी त्यांच्या कन्येला म्हणजेच रोहिणी खडसे यांना जळगाव येथील मुक्ताईनगर विभागातून उमेदवारी देण्यात आली आहे.

वाचा रोहिणी खडसे यांची संपूर्ण माहिती-

36 वर्षीय रोहिणी या समाजकार्यात सक्रिय असल्याने त्या एकनाथ खडसे यांच्या राजकीय वारसदार म्हणून ओळखल्या जातात.

त्यांनी मुंबई विद्यापीठातून बीकॉम तसेच एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. नंतर पुण्यातून त्यांनी एलएलएमपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

त्यांनी आजवर अनेक पदे भूषवली आहेत. त्यातील काही म्हणजे- अध्यक्षा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ मुंबई, अध्यक्षा आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी मुक्ताईनगर, सरचिटणीस भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा

अध्यक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा जळगाव.

नक्की वाचा: भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल म्हणाले, 'पक्षनिष्ठा हा गुन्हा असेन तर, तो मी केला आहे'

तसेच त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांना अनेक संस्थांनी गौरविले आहे.