RBI Banned 5 Banks: आरबीआयने 'या' 5 बँकांवर घातली बंदी; महाराष्ट्रातील 2 बँकाचा समावेश, तुमच्या बँकेचं यात नाव नाही ना? चेक करा

या बँकांचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

RBI (Photo Credits: PTI)

RBI Banned 5 Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 5 सहकारी बँकांवर (Cooperative Banks) विविध निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमध्ये पैसे काढण्यावर बंदी देखील समाविष्ट आहे. या बँकांवरील निर्बंध 6 महिने कायम राहणार आहेत. त्यामुळे या बँकेचे ग्राहक बँकेत जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. तसेच या बँका आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, या बंदीचा आढावा घेतला जात आहे. याचा अर्थ बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊनच ही बंदी हटवण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय मध्यवर्ती बँक घेईल. आरबीआयला बँकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे दिसले तर बंदी उठवली जाईल. या बँकांचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. (हेही वाचा -UFLEX वर पाचव्या दिवशीही आयकर विभागाचा छापा; 715 कोटींचे बोगस व्यवहार सापडले)

या बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेने घातली बंदी -

रिझव्‍‌र्ह बँकेने एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लखनौ (यूपी), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद (महाराष्ट्र), शिमशा को-ऑपरेटिव्ह बँक नियामिथा मद्दूर, (कर्नाटक) उरावकोंडा. को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र), HCBL सहकारी बँक लखनौ (UP), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद (महाराष्ट्र), आणि शिमशा सहकारी बँक नियामिथा मद्दूर, (कर्नाटक) या बँकांवर निर्बंध घातले आहेत. या बँकांचे ग्राहक सध्याच्या तरलतेच्या संकटामुळे त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत.

उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) चे ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवींमधून फक्त 5,000 रुपये काढू शकतात. याचा अर्थ असा की ग्राहकाच्या खात्यात कितीही रक्कम जमा केली असली तरी तो त्याच्या खात्यातून फक्त 5,000 रुपये काढू शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की पाचही सहकारी बँकांच्या पात्र ठेवींना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असेल.



संबंधित बातम्या