Ravindra Dhangekar on Pune Drugs case: पुणे ड्रग्ज प्रकरण, रविंद्र धंगेकर यांच्या दाव्यामुळे खळबळ

पुण्यामध्ये पब संस्कृतीमुळेच ड्रग्जचा महापूर वाढतो आहे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात ड्रग्जचा महापूर येणे हे संस्कृीला धक्का लावणारे आणि हजारो तरुणांचे भविष्य उद्ध्वस करणारे आहे.

Ravindra Dhangekar | (File Image)

Lalit Patil Case: काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन (Pune Drugs Case) सरकार आणि पोलिसांवर सडकून टीका केली आहे. पुण्यामध्ये पब संस्कृतीमुळेच ड्रग्जचा महापूर वाढतो आहे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात ड्रग्जचा महापूर येणे हे संस्कृीला धक्का लावणारे आणि हजारो तरुणांचे भविष्य उद्ध्वस करणारे आहे. चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडणे हे पुणे पोलिसांचे अपयश आणि राज्य सरकारची नाचक्की असल्याचेही रविंद्र धंगेकर म्हणाले. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचा आरोपही आमदारांनी केला आहे.

'पुण्यामध्ये पब संस्कृतीमुळेच ड्रग्ज विक्री '

रविंद्र धंगेकर यांनी म्हटले की, ललीत पाटील प्रकरणी पुणे पोलिसांनी पूर्ण आणि सखोल तपास केला नाही. राज्य सरकारनेही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. या प्रकरणातील संजीव ठाकूर यांना पाठीशी घालण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात विशेष अशी कोणतीही कारवाई केली गेली नाही. ललीत पाटील प्रकरण पुढे आले तेव्हाच मी म्हणालो होतो यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी सक्रीय आहे. पण माझा तो दावा कोणीही मनावर घेतला नाही. माझा अजूनही दावा आहे की, पुण्यामध्ये पब संस्कृतीमुळेच ड्रग्ज विक्री वाढली आहे. या पबमध्येच ड्रग्ज मिळत असते. ज्यामुळे पुण्याच्या संस्कृीतीलाही धक्का लागतो आहे. पुण्यामध्ये पब संस्कृती असू नये असे पुण्यातील नागरिकांचे मत आहे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Meow Meow Drug: 'म्याव म्याव' ड्रग्जबाबत महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत छापेमारी; 3500 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त)

ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाईंड पंजाब प्रांतातील?

रविंद्र धंगेकर यानी पुणे ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाईंड पंजाब प्रांतातील आहे. तोस सध्या आपल्या कुटुंबीयांसह इंग्लंड येथे राहतो. इतकेच नव्हे तर तो पाठिमागील अनेक वर्षांपासून तिथेच वास्तव्यास असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या व्यक्तीस कुरुकुंभ येथे मारलेल्या छाप्यांमध्ये 2016 मध्येच पकडण्यात आले होते. त्या वेळी 350 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याच प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत होता. इतकेच नव्हे तर, शिक्षा होत असतानाच हा व्यक्ती 'मास्टरमाईंड'ची वैभव माने आणि हैदर शेख यांच्या संपर्कात आला. ज्यामुळे पुण्यामध्ये ड्रग्जचे प्रमाण प्रचंड वाढले.

धंगेकर यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणाची पोलखोलच केली. ते म्हणाले, पुण्यामध्ये ड्रग्ज आणि ते पुरविणाऱ्यांना वेगवेगळी नावे असतात. कोडवर्ड असतात. जसे की, आरोपी वैभव माने याच्यासाठी 'लंबा बाल' तर मुंबईत राहणाऱ्या युवराज भुजबळ याच्यासाठी 'मुंबई का बंदर' असा कोडवर्ड होता. दरम्यान, पुणे ड्रग्ज प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.