Ravi Mhatre Replaces Milind Narvekar: उद्धव ठाकरे यांचा निर्णायक बदल? मिलिंद नार्वेकर यांच्या ऐवजी रवी म्हात्रे यांची निवड? शिवसेनेतेत खांदेपालट?
हे बदल केवळ पदाधिकारी आणि संघटनाच नव्हे तर व्यक्तिगत वर्तुळातही माहिती, संवाद आणि यंत्रणा पोहोचविणाऱ्या यंत्रणेत केले जात आहेत,अशी चर्चा आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर पक्षांतर्गत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे बदल केवळ पदाधिकारी आणि संघटनाच नव्हे तर व्यक्तिगत वर्तुळातही माहिती, संवाद आणि यंत्रणा पोहोचविणाऱ्या यंत्रणेत केले जात आहेत. प्रसारमाध्यमांनी याबाब वृत्त दिले असून या वृत्तात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांचे उजवा हात अशी ओळख असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या ऐवजी आता रवी म्हात्रे (Ravi Mhatre) यांच्यावर अधिक जबाबदारी सोपवली आहे. रवी म्हात्रे हे खंदे आणि कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ते अतिशय मर्जीतील होते असे सांगीतले जाते.
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड करुन बाहेर पडले तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवती एक चौकडी जमली आहे, असा आरोप केला जात होता. आरोपांमध्ये ज्या लोकांची नावे घेतली जात होती. त्यात मिलींद नार्वेकर यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावरील जबाबदारी काहीशी बदलेल्याचे बोलले जात आहे. अर्थात याबाबत अद्याप तरी अधिकृत पुष्टी मिळाली नाही. मात्र, राजकीय वर्तुळात मात्र याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, Shivsena Dasara Melava 2022: शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा? शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी)
सांगितले जात आहे की, पाठिमागील काही दिवसांपासून रवी म्हात्रे यांचा मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या वर्तुळात वावर वाढळा आहे. खरे म्हणजे रवी म्हात्रे मधल्या काही काळात शिवसेनेत फारसे सक्रीय नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडापासून ते शिवसेनेत पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. गोरेगाव येथेही नुकताच शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातही रवी म्हात्रे हे फाईल घेऊन उद्धव ठाकरे यांच्या बाजूला शांत उभे असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे म्हात्रे यांनी मिलींद नार्वेकर यांची जागा घेतली काय असे बलले जात आहे.