रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: विनायक राऊत विरुद्ध निलेश राणेंमध्ये चुरशीची लढत

विनायक राऊत विरुद्ध निलेश राणेंमध्ये पाहायला मिळणार कडवी टक्कर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: विनायक राऊत विरुद्ध निलेश राणेंमध्ये चुरशीची लढत
vinayak raut and nilesh rane (Photo credits: File Photo)

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे (Nilesh Rane) आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर, काँग्रेसमधून नविनचंद्र बांदोडकर(Navinchandra Bandodkar)आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी हे देखील ह्या मतदारसंघातून लढत आहे. मात्र खरी लढत पाहायला मिळणार ती विनायक राऊत आणि निलेश राणेंमध्ये.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

मागील लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी 1.5 लाख मतांनी निलेश राणेंचा घसघशीत पराभव केला होता. ह्या पराभवाने निलेश राणेंना जोराचा झटकाच बसला. हा निकाल जितका निलेश राणेंसाठी अनपेक्षित होता तितकाच तो महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेसाठी. तेव्हापासून त्या पराभव विजय मिळवणे हाच एकच ध्यास लागलेल्या निलेश राणे यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उडी मारली. मात्र त्यातही त्यांच्या मागची विघ्न काही संपत नव्हती. लोकसभा निवडणूक 2019 चा तिसरा टप्पा अगदी 2 दिवसांवर आला असता, महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेच्या 18 पदाधिका-यांनी राजीनामा देऊन विनायक राऊत यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्यामागे थोडी का होईना पण पराभवाची भीती किंबहुना पराभवाची टांगती तलवार कायम मागे राहिल असेच म्हणावे लागेल.

Maharashtra Lok Sabha Elections 2019 Exit Poll Results : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल अंदाज इथे पाहा सविस्तर

तर दुसरीकडे 2014 लोकसभा निवडणूकीत 1.5 लाख मतांनी निलेश राणेंना पराभूत केलेले शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यंदा पुन्हा निलेश राणेंना टक्कर देण्यासाठी तयार आहेत. जर काँग्रेसचा उमेदवार लढतीत नसता आणि राणे विरुद्ध राऊत अशी थेट लढत झाली असती तर विनायक राऊत यांना ही निवडणूक अजूनच जड झाली असती, अशी शक्यताही अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तसेच राऊतांवर नाराज असलेल्या भाजपातील काही कार्यकर्त्यांची मते स्वाभिमानकडे वळल्याचेही कानावर येत आहे.

एकंदरीत चित्र पाहता शिवसेना आणि स्वाभिमानच्या थेट लढतीत काँग्रेसच्या उमेदवाराने ठरावीक मते आपल्या बाजूला वळवून लढतीत रंगत आणली आहे. त्यातही रत्नागिरी शिवसेनेच्या बाजूने तर सिंधुदुर्ग राणेंच्या बाजूने उभा राहिल्याचे चित्र आहे.

एकूणच परिस्थिती पाहता कोकणवासियांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे लवकरच कळेल.

(The above story first appeared on LatestLY on May 23, 2019 08:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).