Ratan Tata hospitalised: रतन टाटा मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार
86 वर्षीय टाटा सध्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये आहेत.
टाटा समूहाचे (Tata Group) माजी अध्यक्ष आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक रतन टाटा (Ratan Tata) यांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) सोमवारी (7 ऑक्टोबर) पहाटे दाखल करण्यात आले. वयाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत असलेल्या 86 वर्षीय उद्योगपती टाटा यांना अतिदक्षता विभागात (Ratan Tata ICU) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शाहरुख अस्पी गोलवाला यांच्या नेतृत्वाखाली तज्ञांची एक टीम त्यांच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्राथमिक माहितीनुसार, टाटा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री 12:30 ते 1:00 दरम्यान रुग्णालयात नेण्यात आले होते, असे अहवालात म्हटले आहे.
उद्योगपती रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्य स्थिर आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन आहे, असे सूत्रांच्या हावाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Chip Assembly Plant in Assam: 27 हजार रोजगार निर्माण करण्यासाठी रतन टाटा 27 हजार कोटी रुपये खर्च करणार; काय आहे संपूर्ण योजना? वाचा)
टाटा समूहाचे दीर्घकाळ नेतृत्व
भारतीय व्यवसायातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाणारे रतन टाटा यांनी 1990 ते 2012 पर्यंत दोन दशकांहून अधिक काळ टाटा समूहाचे नेतृत्व केलेआहे. नंतर त्यांनी ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अंतरिम अध्यक्ष म्हणून काम केले. नेतृत्वाच्या भूमिकेतून पायउतार झाल्यानंतरही, ते टाटा समूहाच्या धर्मादाय संस्थांवर देखरेख ठेवतात, ज्या भारतभर परोपकारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. (हेही वाचा, Ratan Tata’s Strict Instructions: ताज हॉटेलच्या आवारात झोपलेल्या कुत्र्याचा फोटो व्हायरल; रतन टाटा यांच्याशी आहे संबंध)
नागरी पुरस्कारांनी सन्मान
रतन टाटांना त्यांच्या कारकिर्दीत भारताच्या प्रतिष्ठित नागरी सन्मानांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 2008 मध्ये त्यांना व्यापार आणि उद्योगातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.
ठळक घडामोडी
- टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- वयाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांमुळे 86 वर्षीय वृद्ध सध्या आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली आहेत.
- हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शाहरुख अस्पी गोलवाला यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे.
रतन टाटा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु
दरम्यान, आपल्या व्यावसायिक कौशल्य आणि परोपकारी प्रयत्नांद्वारे पिढ्यांना प्रेरणा देत असलेल्या टाटा यांना वृद्धापकाळाने रुग्णालात दाखल करण्या आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यन, रतन टाटा हे भारतातील प्रसिद्ध आणि व्यक्तीमत्त्वापैकी एक आहेत. आज जरी ते वयाच्या 86 व्या वर्षात असले तरी, त्यांचा प्रभाव तरुणावरही अधिक पडलेला पाहायला मिळतो. त्यामुळे एकाच वेळी ते आजोबा, वडील आणि मुलगा अशा तिन्ही पिढ्यांशी जोडून घेताना दिसतात.