Rashmi Thackeray in MVA Mumbai Morcha: रश्मी ठाकरे मविआच्या महाविराट मोर्चात सहभागी, शिवसैनिकांमध्ये उत्साह
कोणत्याही राजकीय कार्यक्रमात उपस्थिती वगळता रश्मी ठाकरे सहसा सहभागी होत नाही. आजवर झाल्या नाहीत. त्यामुळे आजच्या मोर्चात रश्मी ठाकरे यांचे सहभागी होणे ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) महाविकासआघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुंबईतील मोर्चामध्ये (MVA Mumbai Morcha) सहभागी झाल्या आहेत. कोणत्याही राजकीय कार्यक्रमात उपस्थिती वगळता रश्मी ठाकरे सहसा सहभागी होत नाही. आजवर झाल्या नाहीत. त्यामुळे आजच्या मोर्चात रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray in MVA Mumbai Morcha) यांचे सहभागी होणे ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारख्या महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त आणि अवमानकारक वक्तव्ये केली जातात. त्याविरोधात महाविकासआघाडीने मुंबईत महाविराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात रश्मी ठाकरे सहभागी झाल्या आहेत.
रश्मी ठाकरे यांचे मोर्चात सहभागी होणे हे राजकीय अर्थाने महत्त्वपूर्ण मानले जात आहे. भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक महिला होईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे विधान आणि रश्मी ठाकरे यांचे आज मोर्चात अचानक सक्रीय होणे हे अनेक अर्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी रश्मी ठाकरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया अथवा भावान प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली नाही. (हेही वाचा, Sanjay Raut's Trendy Look: संजय राऊत यांचा ट्रेंडी लुक, MVA च्या महामोर्चाकडे वेधले लक्ष)
ट्विट
आजच्या विराट मोर्चात उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात या महाविकासआघाडीच्या प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. संजय राऊत, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यासह भाई ठाकूर यांच्यासह तमाम कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मोर्चाच्या शेवटच्या ठिकाणी होणाऱ्या सभेत शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या मोर्चाला हे नेते कसे संबोधीत करतात, काय संदेश देतात याबातब उत्सुकता लागली आहे.