Rashmi Shukla DGP Of Maharashtra: रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती
रश्मी शुक्ला यांची निवड राज्याच्या पोलीस महासंचालक (Rashmi Shukla DGP Of Maharashtra) म्हणून करण्यात आली आहे.
वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्रातील नवीन पोलीस महासंचालक (Rashmi Shukla DGP Of Maharashtra) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उल्लेखनीय असे की, त्यांच्या रुपात महाराष्ट्राला प्रथमच महिला पोलीस संचालक मिळाल्या आहेत. 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी राहिल्या आहेत. शुक्ला यांनी यापूर्वी सशस्त्र सीमा बलचे महासंचालक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणून काम केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या फोन टॅपींग प्रकरणात त्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या होत्या. मात्र, आता त्यांना बडती मिळाली आहे.
कारकिर्द वादाच्या भोवऱ्यात
रश्मी शुक्ला यांची एकूण कारकिर्दच वादग्रस्त राहिली आहे. फोन टॅपींग प्रकरणात त्यांच्यावर मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल होते. त्यातील दोन्ही गुन्हे कोर्टाने पुढे रद्द केले. शुक्ला यांनी पदावर असताना बेकायदेशीररित्या नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. पुढे हे प्रकरण कोर्टाने गुन्हे रद्द केल्यावर शांत झाले. (हेही वाचा, Phone Tapping Case: फोन टॅप प्रकरणी Nana Patole यांनी उचलले मोठे पाऊल; Rashmi Shukla यांच्याविरुद्ध दाखल केला 500 कोटींचा मानहानीचा दावा (Watch Video))
गुन्हे रद्द होताच मिळाले बक्षीस
आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध फोन टॅपींग प्रकरणात दाखल दोन गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांमध्ये राज्य सरकारने त्यांना प्रतिष्ठित पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आला आहे. मुंबईत दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यात शुक्ला यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्यासह प्रमुख व्यक्तींचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. पुण्यातील दुसऱ्या एफआयआरमध्ये त्यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, New Chairman Of MPSC: IPS अधिकारी रजनीश सेठ यांची MPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती, तर रश्मी शुक्ला बनल्या DGP)
रश्मी शुक्ला यांच्यावर केवळ फोन टॅपींग केल्याचाच नव्हे तर एक एक वर्गीकृत अहवाल लीक केल्याचा आणि आर्थिक लाभाच्या बदल्यात बदल्या आणि पोस्टिंग करणाऱ्या काही पोलीस अधिकारी आणि मध्यस्थ यांच्यातील संबंध उघड केल्याचा आरोप आहे. गुप्तचर विभागाचे (SID) आयुक्त असताना त्यांनी तयार केलेल्या गोपनीय अहवालाचीही जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, शुक्ला यांनी नेहमीच त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. आता तर त्यांना राज्य सरकारनेच मोठी नियुक्ती दिल्याने त्यांच्या नियुक्तीबद्दल चर्चा झाली नाही तरच नवल.